‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, चैतन्य अर्जुनला तू जेवत का नाही आहेस असं विचारतो. तू आज सगळ्या बायका वटपौर्णिमेच्या उपवास करतात तसा तू सायली वहिनीसाठी उपवास पकडला का? असं विचारतो. अर्जुन हो म्हणतो. चैतन्य खूप हसतो. तू कधी पर्यंत तुझं प्रेम असं लपवून ठेवणार आहे असं चैतन्य अर्जुनला विचारतो. तुला माहिती आहे मधुभाऊ सुटल्यावर आमचा कॉन्ट्रॅक्ट संपेल मग मी सायलीला प्रपोज करेल. मला सायली सात जन्म माझी बायको हवी आहे असं अर्जुन सांगतो. तर सायली वटपौर्णिमेच्या आठवणी डायरीत लिहित आठवणीत रमते. (Tharal Tar Mag Serial Update)
त्यानंतर महापती आणि प्रिया साक्षी तू अर्जुन,चैतन्यची चांगलीच वाट लावली असं म्हणत तिचं कौतुक करतात. हे तर काहीचं नाही मी त्यांच्यावर आणखी मोठा बॉम्ब टाकणार आहे असं साक्षी त्यांना सांगते. आणि तुम्ही त्यांच्या घरी रहा आणि काय घडतं हे मला सांगा असं म्हणत ते तिघे प्लॅन करतात. घरी सायली अर्जुनची काळजी करते. हे पाहून विमल तिची दृष्ट काढते. तेव्हा अर्जुन चैतन्य घरी येतात.सायली अर्जुनला पाणी देत असते तेव्हा अर्जुनला चक्कर येते.घरी सगळे जण घाबरतात. सायलीला काळजी वाटते.
अर्जुन शुध्दीवर येतो, तेव्हा अशी अचानक चक्कर कशी आली तुला ? काही स्ट्रेस आहे का ? असं बाबा, आश्विन विचारतात.तेव्हा अर्जुनची तारांबळ उडते पण सायलीच्या हातून त्याचा उपहास सुटला याचा त्याला आनंद होत असतो .सायली खायला बनवते असं म्हणत चैतन्यला जेवून जा असं म्हणते. तेव्हा त्याला भूक नाही असं अर्जुन म्हणतो. पण सायलीसाठी अर्जुनने उपवास पकडला असं चैतन्य सगळ्यांना सांगतो. सगळे त्याची मस्करी करतात पण सायलीला आनंद होतो.
दुसरीकडे रात्री रविराज यांना एक कॉल येतो. असं कसं झालं? असं ते बोलत असताना साक्षी येते.कोणाचा कॉल होता? काय झालं? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते पण रविराज काहीही सांगत नाही. अर्जुनला रविरजचा कॉल येतो, महपतीच्या वकिलाने अर्जंट कोर्टात हायरिंग ठेवली सांगतो.आणि उद्याची तारीख आहे सांगतो तेव्हा अर्जुनला राग येतो. पुढच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, कोर्टात अर्जुनला घेत नाही तेव्हा साक्षी व अण्णा त्याला टोमणे मारतात.