‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळणार आहे की, इकडे प्रीतम व हरीश हरीशला ऍडशूटच्यावेळी नेमकं सरबतातून कोणी काय दिलं याचा शोध घेत असतात. तर इकडे मारुती पारुला बंगल्यात जायला सांगतो कारण आज वटपौर्णिमा आहे किर्लोस्करांच्या सूना या वटपौर्णिमेसाठी उपवास धरतात आणि वडाची पूजा देखील करायला जातात त्यांना काही लागलं तर तू तिथे असायला हवी तसं म्हणून तो तिला तिथून पाठवून देतो. बंगल्यात आल्यावर पारू बघते तर अहिल्यादेवी किचनमध्ये काम करत असतात ते पाहून पारू त्यांना विचारते तुम्हाला मी काही मदत करु का?, यावर अहिल्यादेवी नको आज मी आणि दामिनी स्वयंपाक घर सांभाळणार असल्याचे सांगतात आणि तू उपवास धरला आहेस का?, असं देखील पारूला विचारतात. यावर पारू नाही असे म्हणते. (Paaru serial update)
तेव्हा अहिल्यादेवी म्हणतात, तू आणि दिशा आता पुढच्या वर्षी उपवास धरायचा असं म्हणत त्या जेवण करु लागतात आणि दामिनीला वाटण करायला सांगतात. तर एकीकडे दामिनीचा दामिनीची टंगळमंगळ ही सुरु असलेली पाहायला मिळते. त्यानंतर दिशा अहिल्यादेवींना आदित्य कुठे आहे याबद्दल विचारते त्यावर त्यावर अहिल्यादेवी सांगतात की, आदित्यला पुन्हा ताप आला आहे त्यामुळे तो आराम करतोय. हे ऐकल्यानंतर पारूला खूप भीती वाटते. पारूला अहिल्यादेवी पेज घेऊन आदित्यला द्यायला सांगतात. मारुती पेज घेऊन आदित्यच्या रूममध्ये जाते. मात्र आदित्यला ती पेज खायची नसते तेव्हा पारूला वाईट वाटतं. पारूला वाईट वाटू नये म्हणून आदित्य ती पेज खातो आणि बोलता बोलता बोलून जातो की, एवढ्याशा तापाने मी काही मरणार नाही आहे. यावर पारू त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि सांगते की, तुम्ही असं काही बोलू नका आणि तिला रडू येतं. त्यानंतर ती तिथून निघून जाते.
इकडे किलोस्करांच्या सूना वडाची पूजा करायला पोहोचलेल्या असतात. अहिल्यादेवी वडाची पूजा करायला सुरुवात करतात तेव्हा त्या दामिनीलाही आवाज देऊन सांगतात की, तुलासुद्धा पूजा करायची नाही आहे का?, तेव्हा ती घाईघाईने येते आणि पूजा करु लागते. वडाला फेऱ्या घेत असताना दामिनीचा धक्का ताटाला लागतो आणि ते ताट खाली पडतं आणि अगरबत्ती अचानक आगीच्या पेट घेत जळू लागतात. सगळ्या बायका ही आग बघून पळू लागतात. मात्र अहिल्यादेवी धागा सोडत नाहीत आणि वडाला फेऱ्या मारत असतात तितक्यातच त्यांच्या पदराला आग लागते. हे सगळं सावित्री, पारू, दिशा, दामिनी सगळेजण बघत असतात.
आणखी वाचा – ‘या’ मराठी अभिनेत्री लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा कशी करणार साजरी?, नवा सण असणार खास
तर मालिकेच्या पुढील भागात सगळे घरी गेल्यानंतर पारूदेखील वडाची पूजा करु लागते. ते सावित्री पाहते. आता अहिल्यादेवींच्या या आगीतून पारू कशी सुटका करणार हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.