शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दादा कोंडकेंनी दिलेल्या ‘त्या’ भाजीमुळे रझा मुराद महाराष्ट्राच्या प्रेमात, अभिनेत्याने सांगितली ‘ती’ खास आठवण

Saurabh Moreby Saurabh More
जून 21, 2024 | 11:33 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Raza Murad fell in love with Maharashtra because of the potato’s bhaji given by Dada Kondke actor shared his memory

दादा कोंडकेंनी दिलेल्या ‘त्या’ भाजीमुळे रझा मुराद महाराष्ट्राच्या प्रेमात, अभिनेत्याने सांगितली ‘ती’ खास आठवण

दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांनी मराठी सिनेसृष्टीसाठी दिलेले योगदान हे अमूल्य आहे. बहुरंगी व्यक्तीमत्व असलेल्या दादा कोंडके यांना महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभले आहे. दादा कोंडके यांच्या कॉमेडीचा दबदबा आजही तसाच आहे. त्यांचे चित्रपट पाहताना प्रेक्षक आजही लोटपोट हसतात आणि त्यांच्या चित्रपटाचे किस्से आजही लोकांमध्ये प्रचलित आहेत. असाच ‘आगे की सोच’ या त्यांच्या गाजलेल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा रझा मुराद यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितला.

यावेळी रझा मुराद यांनी असं म्हटले की, “‘आगे की सोच’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दादा कोंडके यांनी मला महाराष्ट्रीयन पद्धतीची पिवळी बटाट्याची भाजी खायला घातली होती. त्या चवीने माझ्या मनात महाराष्ट्राची आठवण कायमची कोरली गेली. दादा कोंडके यांच्या साधेपणाने आणि प्रेमाने मी मंत्रमुग्ध झालो होतो. त्यांच्या सहवासात काम करणे ही एक अविस्मरणीय अनुभव होता”.

आणखी वाचा – नेत्राच्या बाळाला जीवे मारण्यात विरोचक यशस्वी होणार का? नेमका कुणाचा बळी जाणार? मालिकेला नवं वळण

हा चित्रपट १९८८ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि आजही या चित्रपटातील प्रत्येक सीन चाहत्यांच्या मनात कायमचा कोरला गेलेला आहे. गणपत नावाच्या साध्या आणि प्रामाणिक माणसाची कथा या चित्रपटात दादा कोंडके यांनी अप्रतिम पद्धतीने मांडली. ३५ वर्षांपूर्वी आलेला ‘आगे की सोच’ हा चित्रपट येत्या २३ जून रोजी पुन्हा एकदा झी टॉकीज वाहिनीवर दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता हिंदी ऑडिओसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आणखी वाचा – अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी, रोख रक्कमेसह काही वस्तू लंपास, अभिनेत्याने व्हिडीओद्वारे दाखवलं सत्य

दादा कोंडके यांच्या मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांनीही तितक्याच ताकदीने हसवले आहे. त्यामुळे दादा कोंडके यांचे मराठीसह हिंदी चित्रपटांचेही अनेक  चाहते आहेत. अशातच झी टॉकीज वाहिनी दादा कोंडके यांच्या हिंदी चित्रपटांचे प्रीमियरसुद्धा प्रेक्षकांसमोर सादर करत आहे. त्यामुळे हिंदी प्रेक्षकांनाही दादा कोंडके यांच्या विनोदी शैलीचा आनंद लुटता येईल. तर, या रविवारी म्हणजेच २३ जून रोजी दादा कोंडके यांच्या आगे की सोच’ या चित्रपटातून प्रेक्षकांना निखळ विनोदाचा आनंद लुटता येणार आहे.

Tags: dada kondkemarathi entertainment newsRaza Murad
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Next Post
sonakshi sinha wedding

लग्नापूर्वीच लेकीच्या सासरी पोहोचले शत्रुघ्न सिन्हा, जावई सासऱ्यांना गाडीपर्यंत सोडायलाही आला अन्…; गळाभेट घेतानाचा फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.