रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : १० महिन्याच्या मुलाला घेऊन उमरासाठी सौदी अरेबियामध्ये पोहोचली सुप्रसिद्ध अभिनेत्री, तिथेच ढसाढसा रडू लागली अन्…; व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 20, 2024 | 1:10 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
actress Gauhar khan crying video

Video : १० महिन्याच्या मुलाला घेऊन उमरासाठी सौदी अरेबियामध्ये पोहोचली सुप्रसिद्ध अभिनेत्री, तिथेच ढसाढसा रडू लागली अन्...; व्हिडीओ व्हायरल

लहान पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान ही तिच्या नृत्य व अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. ‘फेमिना मिस इंडिया’च्या माध्यमातून तिने २००२ साली या क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ‘हवा मे उडता जाये’ या गाण्यामधून ती प्रेक्षकांच्या समोर आली आणि तिने त्यांच्या हृदयात स्थान मिळवले. त्यानंतर ती गाण्यांमध्ये दिसून आली. तिच्या सर्व गाण्यांची प्रशंसा करण्यात आली. त्यानंतर तिने  झैद दरबार दरबारबरोबर २०२० साली लग्नबंधनात अडकली. दोघांना एक मुलगाही आहे. गौहर व झैद हे दोघेही उत्तम नृत्य करतात. ते सोशल मीडियाच्या माध्यामातून नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असतात. पण आता नुकताच गौहरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती रडताना दिसत आहे. (actress Gauhar khan crying video)

गौहर व झैद हे दोघेही खूप फिरताना दिसतात. त्यांच्याबरोबर त्यांचा १० महिन्याचा मुलगाही दिसतो. ते आता एकत्रित पाहिल्यांदाच उमरा करण्यासाठी सौदी अरेबीया येथे पोहोचले आहेत. ते सध्या मदिनामध्ये असून तीर्थयात्रा पूर्ण करण्यासाठी मक्का येथे जातील. गौहरने आतापर्यंत या यात्रेचे सर्व फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये १० महिन्याच्या जेहानबरोबर पहिल्यांदाच ‘मस्जिद अल नवाबी’ येथे फिरताना दिसत आहेत. तेथे तीर्थस्थान व आपल्या मुलाकडे बघून गौहर खान रडत असल्याचे दिसून आले आहे.

आणखी वाचा – समीर धर्माधिकारी यांची पत्नी कलाक्षेत्रामध्येच आहे कार्यरत, पहिल्यांदाच रिलेशनशिपबाबत केला खुलासा, म्हणाले, “आमचं लवकर लग्न झालं पण…”

View this post on Instagram

A post shared by Zaid Darbar (@zaid_darbar)

त्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले आहे की, “जेव्हा तुम्ही इथे येता तेव्हा तुमच्या भावना जागृत होतात. तुम्ही कितीही वेळा गेलात तरीही हे फक्त तुमच्यातील भावना तुमच्या मनातून येते. पण तुम्ही जेव्हा तुमच्या मुलाला पहिल्यांदा मस्जिद अल नवाबीमध्ये हात हलवताना बघाल तेव्हा मात्र ही भावना शब्दांत सांगता येत नाही. सुभान अल्लाह”, हा काळजाला भिडणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यावर खूप लाईक्स व प्रतिक्रिया आल्या आहेत.

आणखी वाचा – “तुमचाच मुलगा आहे हे सिद्ध करा”, सिद्धू मुसेवालाच्या आईला मुलगा झाल्यानंतर पंजाब सरकारची विचित्र मागणी, गायकाचे वडील म्हणाले, “खूप त्रास…”

गौहरची ही मदिनाची दुसरी तीर्थयात्रा आहे. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगाही आहे. जेहानचा जन्म १० मे २०२३ रोजी झाला होता.   

Tags: gauhar khanmadinamakkaPilgrimageSaudi arebiaumrazaid darbar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Arundhati Nayar Accident

व्हेंटिलेटरवर आहे दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेत्री अरुंधती, भीषण अपघातानंतर मृत्यूशी झुंज, कुटुंबियही मागत आहेत पैशांची मदत, कलाकारांचीही मदत नाही अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.