गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

व्हेंटिलेटरवर आहे दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेत्री अरुंधती, भीषण अपघातानंतर मृत्यूशी झुंज, कुटुंबियही मागत आहेत पैशांची मदत, कलाकारांचीही मदत नाही अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 20, 2024 | 1:12 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Arundhati Nayar Accident

व्हेंटिलेटरवर आहे दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेत्री अरुंधती, भीषण अपघातानंतर मृत्यूशी झुंज, कुटुंबियही मागत आहेत पैशांची मदत, कलाकारांचीही मदत नाही अन्…

दाक्षिणात्य अभिनेत्री अरुंधती नायरच्या अपघाताच्या बातमीने साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या अपघातादरम्यान अभिनेत्रीला गंभीर दुखापत झाली. सध्या अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक आहे. तमिळ व मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलेल्या अरुंधती नायरचा १४ मार्च रोजी भीषण अपघात झाला. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिनेत्री गेल्या ६ दिवसांपासून रुग्णालयात असून मृत्यूशी लढा देत आहे. यादरम्यान अभिनेत्रीला शस्त्रक्रियाही कराव्या लागणार आहेत, त्यासाठी तिची मैत्रिण गोपिका अनिल हिने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. कुटुंबाने निधी उभारणी मोहिमेद्वारे लोकांकडून पैसेही मागितले आहेत. (Arundhati Nair Accident)

गोपिका अनिलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने तिची मैत्रिणी अरुंधती नायरसाठी आर्थिक मदतीची हाक दिली आहे. चाहत्यांना व फॉलोअर्सला मदतीसाठीचे आवाहन केले आहे. गोपिका अनिलने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर बँक खात्याचे तपशील देखील शेअर केले ज्यामध्ये पैसे जमा करता येऊ शकतील. गोपिका अनिलने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे की, “माझी मैत्रिण अरुंधती नायरची प्रकृती अजूनही नाजूक आहे. काही दिवसांपूर्वी तिचा अपघात झाला होता. ती अजूनही व्हेंटिलेटरवर आहे आणि दररोज हॉस्पिटलचे बिल वाढत आहे, जे तिच्या कुटुंबाला परवडणे कठीण झाले आहे. आम्ही आमच्या बाजूने योगदान देत आहोत, परंतु रुग्णालयाचे बिल खूप जास्त असल्याने ते पुरेसे नाही. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, अरुंधती आणि तिच्या कुटुंबियांना मदत करता यावी यासाठी तुम्ही जमेल त्या मार्गाने पैसे द्या. ती लवकर बरी व्हावी यासाठी आपण सर्व मिळून प्रार्थना करुया”, असं कॅप्शन देत तिने मदतीची हाक दिली आहे.

आणखी वाचा – समीर धर्माधिकारी यांची पत्नी कलाक्षेत्रामध्येच आहे कार्यरत, पहिल्यांदाच रिलेशनशिपबाबत केला खुलासा, म्हणाले, “आमचं लवकर लग्न झालं पण…”

अरुंधती नायरची आणखी एक मैत्रीण रेम्या जोसेफ म्हणाली की, “अभिनेत्रीला तिच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. पण तमिळ चित्रपटसृष्टीतील कोणीही अभिनेत्रीच्या मदतीसाठी पुढे आले नाही”, असंही सांगितलं. याबाबत रेम्या जोसेफने पीटीआयला सांगितले की, “अरुंधतीने तामिळमध्ये मुख्य नायिका म्हणून पाच चित्रपट केले आहेत”.

आणखी वाचा – नवऱ्यासह माहेरी पोहोचली मुग्धा वैशंपायन, अलिबागमध्ये कुटुंबियांबरोबर जेवण, धमाल-मस्ती अन्…; एकत्रित कुटुंबाचं कौतुक

अरुंधतीसाठी आर्थिक मदतीची मागणी करताच अनेकांनी अभिनेत्रीच्या कुटुंबियांना व मित्रपरिवाराला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. या ट्रोलर्सला उत्तर देत अरुंधतीची बहीण आरती नायरने ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं की, “माझी बहीण गंभीर जखमी झाली आहे. आणि काही दिवसांपासून तिच्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. आर्थिक मदतीची विनंती करताच काहींनी हा घोटाळा आहे, असं म्हणत ट्रोल करायला सुरुवात केली आहे. आम्ही हॉस्पिटलमध्ये धावपळ करत असताना आम्हाला अशा नकारात्मकतेला सामोरे जावे लागले”.

Tags: arundhati nayarArundhati Nayar Accidentarundhati nayar family trollentertainmentsouth actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
Elvish Yadav Father Statement

ना आलिशान घर, ना महागडी गाडी! तुरुंगात जाताच एल्विश यादवबाबत वडिलांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले, "दिखाव्यासाठी तो…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.