शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

समीर धर्माधिकारी यांची पत्नी कलाक्षेत्रामध्येच आहे कार्यरत, पहिल्यांदाच रिलेशनशिपबाबत केला खुलासा, म्हणाले, “आमचं लवकर लग्न झालं पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 20, 2024 | 12:31 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sameer Dharmadhikari On Married Life

समीर धर्माधिकारी यांची पत्नी कलाक्षेत्रामध्येच आहे कार्यरत, पहिल्यांदाच रिलेशनशिपबाबत केला खुलासा, म्हणाले, "आमचं लवकर लग्न झालं पण…"

सिंघम रिटर्न्स’, ‘मुंबई मेरी जान’, ‘सत्ता’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमधून तसेच ‘लालबाग परळ’, ‘शेर शिवराज’, ‘वजन दार’, ‘बॉईज ३’ यांसारख्या हिट मराठी चित्रपटांधून आणि ‘चक्रवर्ती अशोका सम्राट’, ‘झाशी की राणी’ यांसारख्या अनेक मालिकांमधून अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता म्हणेज समीर धर्माधिकारी. त्यांचा अभिनयक्षेत्रात पदार्पण केल्यानंतर ते यशस्वी अभिनेता होण्यापर्यंतचा प्रवास हा वाखाणण्याजोगा होता. समीर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या सुखी संसाराबाबत आणि आताच्या पिढीचा संसाराकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोनाबाबत नुकत्याच ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. (Sameer Dharmadhikari On Married Life)

“समाजात असं चित्र आहे की, लग्न थाटामाटात होत आहेत पण तरीही पती पत्नीपासून लांब राहणं अशा घटना घडताना दिसत आहेत, तर तुझ्या संसाराची जमेची बाजू कोणती आहे, आणि तू या गोष्टीकडे कसं ‘लालबाग परळ’, ‘शेर शिवराज’ पाहतोस?”, असा प्रश्न समीर धर्माधिकारी यांना विचारला असता, यावर उत्तर देत ते म्हणाले, “खरं सांगायचं तर आमच्या सुखी संसाराचं सर्व श्रेय माझ्या बायकोला जातं. कामानिमित्त आज इकडे तर उद्या दुसरीकडे असे दौरे सुरु असतात. आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही आधीच्या पिढीच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर होतो. आमचं फार लवकर लग्न झालं. आमच्यावेळी वचन या शब्दाला अधिक महत्त्व होतं आणि आहे. कोणीच परिपूर्ण नाही. त्यामुळे ज्या गोष्टी नाही आवडत त्या आम्ही कधीच सुधारायला जात नाही. अगदी समजुतीने या सगळ्या गोष्टी घडतात. मात्र आता अगदी याच्या उलट मला तुझा कंटाळा आला आहे, असं बोलून नाती संपतात. हे कदाचित शारीरिक आकर्षणामुळे घडत असावं”.

आणखी वाचा – “शाळेत चांगले गुण…”, आदेश बांदेकरांनी लेकाला दिला होता खास सल्ला, स्वतःच खुलासा करत म्हणाले, “माणूस म्हणून…”

यापुढे ते म्हणाले, “आजकाल लिव्हिंग रिलेशनशिप ही प्रथा सुरु झाली आहे, त्यामुळे एखाद्या बाबतीतील कुतूहल तुम्ही खूप लवकर संपवता. तर काहींच असं म्हणणं आहे की, आम्हाला इतक्यात लग्न करायचं नाही, आम्हाला करिअरकडे लक्ष द्यायचं आहे. आयुष्यातील एकटेपणाचं महत्त्व प्रत्येकाला समजायला हवं. नात्यामध्ये तडजोड ही करायलाच हवी. आई- बाबा हे आपल्याला बायोलॉजिकली मिळतात, पण एक असं नातं असत ज्याची तुम्हाला निवड करावी लागते. आणि ती निवड करताना तुमचा जर गोंधळ उडत असेल तर तुमच्या आयुष्यात तुम्ही किती गोंधळलेले आहेत हे कळतं”.

आणखी वाचा – नवऱ्यासह माहेरी पोहोचली मुग्धा वैशंपायन, अलिबागमध्ये कुटुंबियांबरोबर जेवण, धमाल-मस्ती अन्…; एकत्रित कुटुंबाचं कौतुक

पुढे ते असंही म्हणाले की, “आमच्या संसारात आयुष्य वेगळं आणि काम वेगळं आहे. घरी गेल्यानंतर सारखं चित्रपटाबद्दल बोलत राहणं, तिने एखाद्या सीनचा कसा शॉट लावला आणि एखादा सीन मी कसा दिला, या गोष्टींना वेळ नसतो. माझी बायको १२ तास शूट करुन घरी आल्यानंतर स्वयंपाक करायची. आणि त्यानंतर आम्ही शांतपणे जेवायचो. कधी मी लवकर आलो तर जमेल तितकं मी करायचो. हा संसारातील बॅलेन्स जमणं गरजेचं आहे. आणि त्यात मी अभिनेता आणि ती कॅमेरा क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे आम्ही कायमच एकमेकांची प्रशंसाच करत गेलो”.

Tags: entertainmentmarathi actorsameer dharmadhikariSameer Dharmadhikari On Married Lifesameer dharmadhikari wife
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Nagraj Manjule New Web Series Matka King

नागराज मंजुळेंचं ओटीटी क्षेत्रात पदार्पण, 'मटका किंग' वेबसीरिजची घोषणा, मुख्य भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.