मनोरंजन क्षेत्रात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये माधुरी दीक्षितचं नाव घेतलं घेतलं जातं. अभिनय, सौंदर्य, नृत्य यामुळे तिने चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘बेटा’ या चित्रपटातील ‘धक धक’ गाण्याने सर्वांनाच वेड लावले. त्यानंतर ‘हम आपके है कौन’, ‘दिल तो पागल है’. ‘देवदास’, ‘खलनायक’ अशा दमदार चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. अशातच मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर तिने सर्व चाहत्यांना आनंदाची बातमी दिली ती म्हणजे अभिनेत्रीने नवीन कार खरेदी केली आहे. या कारचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माधुरीकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे, त्यात आता आणखी एक महागडी गाडी सहभागी झाली आहे. (madhuri dixit bought new car)
माधुरी दीक्षितने अलीकडेच एक नवीन सुपरकार घेतली आहे. ज्याची किंमत तब्बल चार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. धक-धक गर्लबरोबर तिच्या नवऱ्याला स्पोर्ट्स कार आणि सुपरकार्सचीही आवड आहे. त्यामुळे तिच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे, यात तिने नुकत्याच घेतलेल्या नवीन कारकहा संमावेश झाला आहे. या कार खरेदीसाठी माधुरीने निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस घातल्याचं पाहायला मिळालं. तर तिचे पती काळे शर्ट, काळी पँट व ब्लेझर घालून दिसत आहेत. त्यांच्या या नवीन कार खरेदी करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर होत आहे.
माधुरी यांच्या या नवीन गाडीच्या व्हिडीओला अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. माधुरीने स्वत: या व्हिडीओवर “मी खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप आनंदी आहे” असं म्हणत आपला आनंद व्यक्त केला आहे. तसेच बॉलिवूड मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळींनी त्यांना या नवीन महागड्या कारच्या खरेदीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांचं कौतुक केलं आहे.
आणखी वाचा – धक्कादायक! सैफ अली खानवर चाकू हल्ला, घरात घुसून ज्ञातांकडून अनेकदा वार, रुग्णालयात उपचार सुरु
दरम्यान, माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. १९८० पासून ते आतापर्यंत तिने चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. लग्नानंतर चित्रपटांमधून ब्रेक घेऊन काही वर्षांनी तिने सिनेसृष्टीत पुनरागमन केले. ती नुकतीच कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि तृप्ती डिमरी यांच्याबरोबर ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटामध्ये दिसली होती.