बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा सध्या खूप चर्चेत आहे. रात्री तीनच्या सुमारास त्याच्या घरात घुसून हल्लेखोराने हल्ला केला. अभिनेत्यावर खूप वारदेखील करण्यात आले आहेत. दरम्यान आता सैफवर मुंबई येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु असून त्याच्यावर अडीच तासांची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. वांद्रा पोळीराणी घटनेच्यावेळचे आणि त्याआधीचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासली आहेत. या सर्व फुटेजमध्ये कोणीही व्यक्ती घरात संशयास्पदरित्या प्रवेश करताना दिसून येत नाही. याप्रकरणी आता तीन संशयास्पद लोकांना ताब्यात घेतलं आहे. (saif ali khan home cctv footage)
या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी चोर व हल्ल्याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे. आरोपींना पकडण्यासाठी एक टीम तयार केली आहे. एका सिनीयर आयपीएस अधिकाऱ्यांनी या प्रकरणासाठी एक टीम तयार केली आहे. या प्रकरणासाठी नोकर व इतर स्टाफला ताब्यात घेतले आहे. मात्र घरातील मोलकरणीवर संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान CCTV फुटेज समोर आले आहेत. या फुटेजमध्ये कोणीही संशयास्पदरित्या येताना किंवा जाताना दिसत नाही आहे. त्यामुळे हल्लेखोर आधीपासूनच घरात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पाइपलाइन किंवा मॅनहोलच्या माध्यमातून घरी प्रवेश केला असेही अंदाज वर्तवले जात आहेत.
‘आजतक’च्या रिपोर्टनुसार, हल्लेखोर हा आधी तैमुर व जेहच्या खोलीकडे गेला. त्यांच्याबरोबर असलेल्या नॅनीला जाग आली. त्यावेळी नॅनीबरोबर हल्लेखोराची बाचाबाची झाली. त्याचवेळी तिथे सैफ आला आणि शांतपणे बोलू लागला. मात्र त्याचवेळी हल्लेखोराणे त्याच्यावर चाकूने वार केले आणि पळून गेला. दरम्यान आता त्याच्या प्रकृतीबद्दल अधिक माहिती समोर येऊ शकली नाही. मात्र त्याची पत्नी करीना कपूरने माहिती दिली आहे.
करीना कपूरच्या टीमने जारी केलेल्या निवेदनात अभिनेत्रीने काल रात्रीची घटना सांगितली आहे आणि सैफच्या तब्येतीचीही माहिती दिली आहे. अभिनेत्री म्हणाली की, “काल रात्री घरात चोरीचा प्रयत्न झाला. सैफच्या हाताला दुखापत झाली असून तो रुग्णालयात आहे. आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. कुटुंबातील उर्वरित सदस्य सुखरुप आहेत”. पुढे निवेदनात करिनाने चाहत्यांना धीर धरण्याचे आवाहन केले आहे. ती म्हणाली, “आम्ही मीडिया आणि चाहत्यांना विनंती करतो की त्यांनी संयम राखावा आणि आणखी कोणत्याही अफवा पसरवू नका कारण पोलिस आधीच योग्य तपास करत आहेत. असलेल्या काळजीबद्दल सर्वांचे आभार”.