सध्या बॉलिवूड अभिनेत्री दिपिका पदुकोण सध्या खूप चर्चेत आली आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये तिने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. मुलीचे नाव दुआ ठेवल्याची माहितीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. बंगळुरू येथील दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये ती मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच दिसून आली होती. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो चांगलाच दिसून आला. तिच्या कॅज्युअल लूकची चांगलीच चर्चा रंगलेली दिसून आली. दीपिकाने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाबरोबरच सौंदर्याचेदेखील अनेक चाहते आहेत. मात्र सध्या ती तिच्या कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. (deepika old video viral)
दीपिकाने २००७ साली शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी दीपिका एक मॉडेल होती. तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केले आहे. हिमेश रेशमीयाच्या ‘नाम है तेरा’ या गाण्यामध्येही ती दिसून आली. अशातच आता दीपिकाचा एक जुना जाहिरातीचा व्हिडीओ समोर आला आहे. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी दीपिका कशी होती? हे यामध्ये बघायला मिळत आहे. ही जाहिरात चेन्नई येथील एका महिलांच्या कपड्यांच्या ब्रॅंडसाठी शूट करण्यात आले होते.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दीपिका नवविवाहित नवरीप्रमाणे दिसत आहे. ती एका माप ओलांडून घरात प्रवेश करताना दिसत आहे. लग्नानंतर ती नवीन आयुष्याबद्दल विचार करत असतानाच आईची आठवण येत असलेलीदेखील दिसत आहे. आईबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण ती आठवताना दिसत आहे. यामध्ये अचानक आईला बघून खूप आनंदी झालेलीही दिसत आहे. यावेळी तिच्या गालावरील खळी अधिक लक्ष वेधत आहे.
दीपिका साधारण यावेळी २० वर्षांची होती. यावेळी तिचे सौंदर्य व निरागसता याबद्दल चर्चा दिसून आली. एका नेटकऱ्याने ही जाहिरात शेअर करत लिहिले की, “तिच्या सुरुवातीच्या २० व्या वर्षाबद्दलचे काही खास क्षण. खूप निरागस आणि इतकी खरी वाटत आहे. दीपिकावरुन नजरच हटत नाही”. यावर एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “त्यावेळी खूप निरागस होती”.तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “खूप गोड आणि हेल्दी”. तसेच अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “कोलगेटच्या जाहिरातीमधील दीपिका मला आठवली. खूप सुंदर दिसायची”. आशा प्रकारे तिच्या सौंदर्याची खूप चर्चा केली आहे.