सध्या बॉलिवूड अभिनेता सलमान खान खूप चर्चेत आहे. गायक अभिजीत भट्टाचार्यने सलमानवर निशाणा साधला आहे. गेल्या अनेक दिवसांनपासून अभिजीतने सलमानबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये अभिजीतने सलमान खान व शाहरुख खान यांच्याबद्दल खूप काही सांगितले आहे. यावेळी त्याने टायगर असे नाव घेऊन सलमानला ठरकी व दारुबाज असल्याचे म्हंटलं आहे. याआधी त्याने सलमानच्या बाबतीत काही सांगण्यासारखं नाही असं म्हंटलं होतं. नंतर त्याने हिट अँड रन प्रकरणावर भाष्य केले आहे. तसेच याआधी केल्या गेलेल्या प्रतिक्रियांवरही भाष्य केले आहे. तो आता काय म्हणाला आहे ते जाणून घेऊया. (Abhijeet Bhattacharya on salman khan)
अभिजीतने शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये सलमानच्या हिट अँड रन प्रकरणाबद्दल विचारले, यामध्ये गायकाने अभिनेत्याला पाठिंबा दिल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. या सगळ्या चर्चा अभिजीतने फेटाळल्या आहेत. तो म्हणला की, “जर कोणी रस्त्यावर झोपत असेल तर एखादा दारुडा किंवा बेजबाबदार व्यक्ती त्यांच्यावर गाडी चढवणार”.
नंतर अभिजीत म्हणाला की, “मी त्याला पाठिंबा दिला? कधीच नाही. याआधीदेखील ट्रकने चार लोकांना चिरडल्याचे समोर आले होते. हे रोज होत आहे. व्यक्ती रस्त्यावर झोपत आहेत फुटपाथवर नाही. मी म्हणालो की रस्त्यावर झोपाल तर दारुडा दारु पिऊन येईल आणि तुमच्यावर गाडी चढवेल. रस्त्यावर कुत्र्यासारखे झोपत आहात. त्यामुळे दारुबाज व फालतू तिथे येणार. मग माझ्याकडून तुम्ही असे का करवून घेत आहात?”.
दरम्यान याचवेळी अभिजीतला विचारले की, “सलमानच्या गाण्यांसाठी ‘टन टना टन’ व ‘चुनरी’ ही गाणी का गायली? त्यावर अभिजीतने उत्तर दिले की, “मी गाणी गाण्याआधी कोणत्या कलाकारासाठी गात आहे? असं कधीही विचारत नाही. जर कोणी म्हणालं की चित्रपट येणार आहे त्यामध्ये गाणं गाणार का? तर मी गाणं गाऊन येणार. मला नाही माहीत मी कोणासाठी गाणार आहे ते”. दरम्यान आता अभिजीतने सलमानबद्दल खूपच खोचक वक्तव्य केली आहेत. सलमान यावर काय प्रतिक्रिया देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.