पंजाबी व बॉलिवूड गायक दिलजीत दोसांझ खूप चर्चेत आला आहे. दिलजीतने आजवर अनेक पंजाबी गाणी गायली आहेत. तसेच तो अनेक बॉलिवूड गाण्यांसाठीदेखील ओळखला जातो. सध्या त्याची ‘दिलूमिनाटी इंडिया टुर’ सुरु आहे. या निमित्ताने भारतातील अनेक राज्यांमध्ये त्याचे कॉन्सर्ट आयोजित केले जात आहेत. दरम्यान त्याचे भारतातील कॉन्सर्ट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्याने पंजाबी सुपरस्टारने अल्टिमेटम दिला आहे की जोपर्यंत सरकार भारतातील कॉन्सर्ट इन्फ्रास्ट्रक्चर सुधारत नाही तोपर्यंत तो भारतात पुन्हा संगीत कॉन्सर्ट करणार नाही. शनिवारी रात्री चंदीगडमध्ये परफॉर्म करताना दिलजीतने हे वक्तव्य केले होते. त्याचे हे वक्तव्य मोठ्या प्रमाणात चर्चेतदेखील राहिले. दरम्यान त्याचा आता मुंबईमधील कॉन्सर्टदेखील चांगलाच चर्चेत आला होता. (dilijit dosanjh mumbai concert)
या महिन्यामध्ये दिलजीतचा मुंबई येथे कॉन्सर्ट पार पडला. या कॉन्सर्टमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेलीदेखील दिसून आली. अशातच आता या कार्यक्रमादरम्यान नक्की काय झाले याबद्दल एका महिलेची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. दिलजीतच्या एका चाहतीने कॉन्सर्टमध्ये आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले आहे. या कॉन्सर्टसाठी तिने १२ हजार रुपये खर्च केल्याचेही सांगितले.
सोशल मीडियावर चाहतीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितले की, “ती रात्र माझ्यासाठी सगळ्यात वाईट रात्र होती. मी १२ हजार रुपये खर्च करुन गोल्डन पास खरेदी केला होता. पण मला काहीही दिसले नाही. तसेच तिथे ज्या बायका उभ्या होत्या. त्यांनी मला शांत राहण्यासाठी सांगितले होते. तसेच त्या ठिकाणी जागा नव्हती. त्या ठिकाणी मी केसदेखील सोडू शकले नाही. पण मी केस बंधावेत अशी त्यांची इच्छा होती. हा कॉन्सर्ट आहे की लोकल?”.
आणखी वाचा – शिवानी सोनारची लगीनघाई सुरु, घरच्यांनी केलं साग्रसंगीत केळवण, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
पुढे तिने सांगितले की, “तिथे माझ्या मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि मी विचारले असता खूप गर्दी असल्याचे कारण सांगितले. माझ्यासाठी हा खूप वाईट अनुभव होता. तिथली मुलं माझ्यावर पडत होती. हा व्हिडीओ माझ्या बहिणीने पाहिला तेव्हा तिला खूप वाईट वाटले. माझ्यामुळे त्रास होत असल्याचे तिथल्या बायकांनी सांगितले. जर शांत राहता येत नसेल तर अशा कॉन्सर्टला येऊ नये असा सल्लादेखील मला त्या बायकांनी दिला. या कॉन्सर्टमुळे माझे पैसे, वेळ वाया गेला.” दरम्यान या प्रकणावर दिलजीतने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.