Deeepika Padukone Viral Video : बॉलिवूडमधील दीपिका पदुकोण ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती गरोदरपणाच्या चर्चांमुळे ती खूप चर्चेत आली आहे. पुढील महिन्यात ती बाळाला जन्म देणार आहे. काही महिन्यांपूर्वीच रणवीर व दीपिका यांनी आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर दीपिका चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळीही ती अनेकदा स्पॉट केली गेली. तिचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. अशातच आता पुन्हा एकदा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
दीपिका पुढील महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. सप्टेंबर २०२४ ला तिची डयू डेट असून याआधीच तिला मुंबई येथे स्पॉट केले गेले. यावेळी तिची सुरक्षा करताना तिचा बॉडीगार्ड जलालुद्दीनदेखील दिसून आला. तिला पाहताच सर्वत्र तिच्याबरोबर फोटो काढण्यासाठी एकच धावपळ सुरु झाली. यावेळी तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सीचा ग्लो चांगलाच दिसून येत होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दीपिका हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून येत आहे. या ड्रेसमध्येही तिचा बेबी बम्प दिसून येत आहे. ती सांभाळून चालत आहे. तिला पाहताच तिथे असलेले चाहते तिच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी खूप धावपळ करत आहेत. यावेळी कोणत्याही चाहत्याला नाराज केले नाही आणि सगळ्यांबरोबर सेल्फी घेतला. यावेळी एका लहान मुलाबरोबरही तिथे फोटो काढला आणि त्याचे लाड केले. हा व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी पसंती देत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिले की, “तिचा सुरक्षारक्षक तिची काळजी घेत आहे”, दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले की, “रणवीर पेक्षा जास्त सुरक्षारक्षक जलालुद्दीन तिची काळजी घेत आहे”.
दरम्यान दीपिका व रणवीरच्या बाळाच्या आगमनासाठी दोन्ही कुटुंबं सज्ज आहेत. त्याचप्रमाणे दीपिकाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटामध्ये दिसून आली होती. आता ती ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.