गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : गरोदरपणात अशी दिसत आहे दीपिका पदुकोण, चाहत्याच्या लहान मुलाला अभिनेत्रीने पाहिलं अन्…; ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 9, 2024 | 12:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Deeepika Padukone Viral Video

दीपिका पदूकोण बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली

Deeepika Padukone Viral Video : बॉलिवूडमधील दीपिका पदुकोण ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती गरोदरपणाच्या चर्चांमुळे ती खूप चर्चेत आली आहे. पुढील महिन्यात ती बाळाला जन्म देणार आहे. काही महिन्यांपूर्वीच रणवीर व दीपिका यांनी आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर दीपिका चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळीही ती अनेकदा स्पॉट केली गेली. तिचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. अशातच आता पुन्हा एकदा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

दीपिका पुढील महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. सप्टेंबर २०२४ ला तिची डयू डेट असून याआधीच तिला मुंबई येथे स्पॉट केले गेले. यावेळी तिची सुरक्षा करताना तिचा बॉडीगार्ड जलालुद्दीनदेखील दिसून आला. तिला पाहताच सर्वत्र तिच्याबरोबर फोटो काढण्यासाठी एकच धावपळ सुरु झाली. यावेळी तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सीचा ग्लो चांगलाच दिसून येत होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे.

आणखी वाचा – 09 August Horoscope : ‘नागपंचमी’च्या दिवशी ‘या’ राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार, नोकरी, व्यवसाय व शिक्षणात होणार फायदे

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दीपिका हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून येत आहे. या ड्रेसमध्येही तिचा बेबी बम्प दिसून येत आहे. ती सांभाळून चालत आहे. तिला पाहताच तिथे असलेले चाहते तिच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी खूप धावपळ करत आहेत. यावेळी कोणत्याही चाहत्याला नाराज केले नाही आणि सगळ्यांबरोबर सेल्फी घेतला. यावेळी एका लहान मुलाबरोबरही तिथे फोटो काढला आणि त्याचे लाड केले. हा व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी पसंती देत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिले की, “तिचा सुरक्षारक्षक तिची काळजी घेत आहे”, दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले की, “रणवीर पेक्षा जास्त सुरक्षारक्षक जलालुद्दीन तिची काळजी घेत आहे”.

आणखी वाचा – बायको असावी तर अशी! Bigg Boss Marathi मधील रितेशच्या कामाचं जिनिलीयाकडून कौतुक, म्हणाली, “प्रिय नवरा तू खूप …”

दरम्यान दीपिका व रणवीरच्या बाळाच्या आगमनासाठी दोन्ही कुटुंबं सज्ज आहेत. त्याचप्रमाणे दीपिकाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटामध्ये दिसून आली होती. आता ती ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

Tags: baby bumpdeepika padukonesocial mediaviral video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
Sonali Patil on Keshavrao Natyagruha Fire

Video : "आमचं हे घर होतं", कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक होताच अभिनेत्री ढसाढसा रडली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.