बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या खूप चर्चेत आहे. 8 सप्टेंबर 2024 साली तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. याबद्दलची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. रविवारी दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. रणवीर सिंह व दीपिकाचा मुलीला घरी घेऊन जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली. रणवीर व दीपिका आई-वडील झाल्यानंतर त्यांना सगळ्यांनीच शुभेच्छा दिल्या होत्या. अशातच आता दीपिकाने असे काही केले आहे की ज्यामुळे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले आहे. (deepika padukone instagram bio)
दीपिकाला रुग्णालयातून घरी पाठवल्यानंतर तिने आपल्या सोशल मीडियामध्ये काही बदल केले. मुलीच्या जन्मानंतर दीपिकाच्या आयुष्यात मोठे बदल झालेले दिसून येत आहेत. दीपिकाने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटचा बायो बदललेला दिसून आला. तिने बायोमध्ये “फिड, बर्प, स्लिप, रिपीट” म्हणजेच बाळाला भरवा, ढेकर काढा, झोपा आणि पुन्हा तेच करा असे लिहिले आहे. दीपिकाच्या या बायोकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.

गणेशोत्सवात दीपिका आणि रणवीरच्या आयुष्यात लक्ष्मीचं आगमन झाल्याचं बोलत त्यांच्या अनेक चाहत्यांनी चिमुकलीसह दीप-वीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला. अशातच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो व व्हिडीओलाही नेटकऱ्यांकडून तूफान प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, दीपिका पदुकोण व रणवीर सिंह यांनी २०१८ मध्ये लग्न केलं. लग्नाच्या ६ वर्षानंतर हे जोडपे एका मुलीचे पालक झाले आहेत.
मुलीच्या जन्मानंतर घरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दीपिका व रणवीर यांनी प्रसूतीपूर्वी बोल्ड फोटोशूटही शेअर केले होते. ज्यामध्ये हे जोडपं खूपच गोड दिसत होते. या फोटोंवर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला होता. आता रणवीर व दीपिका आपल्या लाडक्या मुलीचं नाव काय ठेवणार? याकडेच आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच मुलीची एक झलक पाहायला कधी मिळणार याकडेदेखील चाहते डोळे लाऊन बसले आहेत.