रविवार, ऑगस्ट 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुलीला घरी आणताच दीपिका पदुकोणची उडाली झोप, संपूर्ण आयुष्य बदललं, नक्की काय घडलं?

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 16, 2024 | 1:35 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
deepika padukone instagram bio

दीपिका पदुकोणच्या सोशल मीडियाकडे वेधलं सगळ्यांचं लक्ष

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या खूप चर्चेत आहे. 8 सप्टेंबर 2024 साली तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. याबद्दलची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. रविवारी दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. रणवीर सिंह व दीपिकाचा मुलीला घरी घेऊन जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली. रणवीर व दीपिका आई-वडील झाल्यानंतर त्यांना सगळ्यांनीच शुभेच्छा दिल्या होत्या. अशातच आता दीपिकाने असे काही केले आहे की ज्यामुळे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले आहे. (deepika padukone instagram bio)

दीपिकाला रुग्णालयातून घरी पाठवल्यानंतर तिने आपल्या सोशल मीडियामध्ये काही बदल केले. मुलीच्या जन्मानंतर दीपिकाच्या आयुष्यात मोठे बदल झालेले दिसून येत आहेत. दीपिकाने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटचा बायो बदललेला दिसून आला. तिने बायोमध्ये “फिड, बर्प, स्लिप, रिपीट” म्हणजेच बाळाला भरवा, ढेकर काढा, झोपा आणि पुन्हा तेच करा असे लिहिले आहे. दीपिकाच्या या बायोकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.

आणखी वाचा – गोविंदाच्या मुलीचा जन्माच्या तीन महिन्यांतच झाला होता मृत्यू, पहिल्यांदाच खुलासा, फुफ्फुसांचा आजार आणि…

गणेशोत्सवात दीपिका आणि रणवीरच्या आयुष्यात लक्ष्मीचं आगमन झाल्याचं बोलत त्यांच्या अनेक चाहत्यांनी चिमुकलीसह दीप-वीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला. अशातच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो व व्हिडीओलाही नेटकऱ्यांकडून तूफान प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, दीपिका पदुकोण व रणवीर सिंह यांनी २०१८ मध्ये लग्न केलं. लग्नाच्या ६ वर्षानंतर हे जोडपे एका मुलीचे पालक झाले आहेत.

आणखी वाचा – Video : मायरा वायकुळला भाऊ झाल्यानंतर रुग्णालयात कुटुंबियांचा एकच जल्लोष, दीदी झाले म्हणत रडू लागली अन्…

मुलीच्या जन्मानंतर घरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दीपिका व रणवीर यांनी प्रसूतीपूर्वी बोल्ड फोटोशूटही शेअर केले होते. ज्यामध्ये हे जोडपं खूपच गोड दिसत होते. या फोटोंवर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला होता. आता रणवीर व दीपिका आपल्या लाडक्या मुलीचं नाव काय ठेवणार? याकडेच आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच मुलीची एक झलक पाहायला कधी मिळणार याकडेदेखील चाहते डोळे लाऊन बसले आहेत.

Tags: baby borndeepika padukoneinstagram bio
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Vaibhav Chavan commented on his friendship with Arbaaz Patel in the house

Bigg Boss Marathi : “त्याने माझा वापर केला कारण…”, घराबाहेर आल्यानंतर वैभवचे अरबाजबाबत उघडले डोळे, म्हणाला, “मला जाणवलं…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.