बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या खूप चर्चेत आहे. 8 सप्टेंबर 2024 साली तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. याबद्दलची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. रविवारी दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. रणवीर सिंह व दीपिकाचा मुलीला घरी घेऊन जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली. रणवीर व दीपिका आई-वडील झाल्यानंतर त्यांना सगळ्यांनीच शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर तिने केलेली सोशल मीडिया पोस्टदेखील खूप चर्चेत राहिली. (deepika padukone new house for mothe in law)
दीपिकाची प्रसूती होण्यापूर्वी तिने व रणवीरने वांद्रे येथील अलिशान परिसरात मोठे घर खरेदी केले. तिच्या घराच्या बिल्डिंगचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. लेकीचा नवीन घरात प्रवेश करणार अशा चर्चा सुरु असतानाच एक अजून अपडेट समोर आली आहे. दीपिकाने तिच्या सासूबाईंसाठी म्हणजे अंजु भवनानीसाठी बाजूलाच १७.७३ कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. याचे सहमालक दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोणदेखील आहेत.
दरम्यान मुलीच्या जन्मानंतर सात दिवसांनी तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. घरी जातानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यांच्या लागोपाठ तीन-चार गाड्या एकत्रित असलेल्या दिसल्या. मात्र गाड्या खूप स्पीडमध्ये असल्याने मुलगी दिसली नाही. पण जेव्हा ती रुग्णालयात भरती होती तेव्हा घरचे सर्व तिला बघण्यासाठी पोहोचले होते. बाळाला बघण्यासाठी शाहरुख खान, मुकेश अंबानी, अनंत व राधिका अंबानीदेखील तिला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.
दीपिका व रणवीरने त्यांच्या मुलीच्या नावाची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. तसेच मुलीच्या नावाचा विचार केला आहे पण हे लवकर कोणालाच सांगणार नाही असंदेखील सांगण्यात येत आहे. तसेच दोघांच्याही कामाबद्दल बोलायचे झाले तर दोघंही ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट या दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.