रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ऐश्वर्या रायच्या लेकीच्या संस्कारांचं कौतुक, भर कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या पाया पडली अन्….; व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 19, 2024 | 4:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
aishwarya rai and aaradhya bachchan viral video

ऐश्वर्याच्या लेकीने केलेल्या कृतीने वेधलं सर्वांचंच लक्ष

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या खूप चर्चेत आहे. काही महिन्यांपासून ऐश्वर्या अभिषेक बच्चनपासून वेगळी होणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. अभिषेकने साखरपुड्याची रिंग दाखवत अजूनही विवाहित असल्याची पोस्ट त्याने सोशल मीडियावर केली होती. तसेच त्यानंतर ती दुबईमध्ये अभिषेक व आराध्यासह दिसून आली होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये सर्व व्यवस्थित सुरु असल्याचेदेखील स्पष्ट झाले होते. अशातच आता ऐश्वर्या यांचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये माय-लेकींमधील प्रेम दिसून येत आहे. (aishwarya rai and aaradhya bachchan viral video)

आराध्याचा जन्म झाल्यापासून ती नेहमीच आईबरोबर दिसून आली आहे. अवॉर्ड शो, रेड कार्पेट, कार्यक्रम अशा ठिकाणी त्या बरोबर असलेल्याच दिसून येतात. आराध्या नेहमी तिच्या आईचा आत्मविश्वास वाढवताना दिसते. याबाबतचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. ऐश्वर्याने SIIMA 2024 पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहिली होती. यावेळी तिला ‘पोन्नियन सेलवान’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यावेळी जेव्हा विक्रम चियान व ऐश्वर्या मंचावरुन खाली उतरत होते तेव्हा आराध्या आईकडे धावत आली आणि मिठी मारली.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : अरबाजला घाबरतो संग्राम, अंकिता, पॅडी व अभिजीतने चांगलंच सुनावलं, म्हणाले, “त्याला नाही तर कोणाला भिडणार?”

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

त्याचवेळी तिथे कन्नड सुपरस्टार शिवा राजकुमारदेखील उपस्थित होते. तेव्हा तिची भेट त्यांच्याबरोबर झाली. यावेळी आराध्याने हात जोडून शिवा यांना नमस्कार केलं आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाददेखील घेतले. तिच्या या कृतीने सगळ्यांचेच लक्ष वेधले असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे.

आणखी वाचा – Video : अमिताभ बच्चन बोलले चुकीचं मराठी, गायकाने दाखवून दिली चूक, माफी मागत पुन्हा मराठी बोलले आणि…

हा पुरस्कार सोहळा १४ सप्टेंबर रोजी दुबई येथे पार पडला. यासाठी ऐश्वर्याला पुरस्कारदेखील मिळाला. पुरस्कार घेण्यासाठी ती मंचावर गेली असता आराध्याने पुरस्कार घेतानाचा क्षण मोबाइल कॅमेरामध्ये कैद केला. मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियन सेलवान’च्या पहिल्या व दुसऱ्या भागात ऐश्वर्या दिसून आली होती. यामध्ये तिची वेशभूषा, केशभूषा तसेच तिच्या सौंदर्याने सगळ्यांचेच लक्ष वेधले होते. दरम्यान सध्या ऐश्वर्या नवीन चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसून येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Tags: Aaradhya bachachnaishwrya rai bachchanviral video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 New Promo Dhananjay Powar aka DP and Varsha Usgaonkar fight know the reason

Bigg Boss Marathi : "तुमच्यामध्ये ऐकून घेण्याची क्षमता नाही", डीपीने वर्षा उसगांवकरांना सुनावलं, जोरदार भांडण, म्हणाला, "मी सर्वांच्या तोंडावर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.