बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण व रनवीर सिंह यांना खूप पसंती मिळते. पुढील महिन्यात दीपिका बाळाला जन्म देणार आहे. याबद्दलची घोषणा त्यांनी फेब्रुवारीमध्ये केली होती. त्यानंतर अनेकदा दीपिका बेबी बम्प फ्लॉंट करताना स्पॉट केले गेले. तिचा प्रेग्नन्सीमधील ग्लोदेखील दिसून आला आहे. आशातच आता दीपिका-रणवीर व बाळाबद्दलची एक अपडेट समोर आली आहे. बाळाचे आगमन नवीन घरात होणार असल्याची माहिती समोर आली असून याबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. (deepika padukone and ranveer singh new house)
दीपिका व रणवीरने बाळासाठी तब्बल १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे घर खरेदी केलं आहे. बिल्डिंगचा नवीन व्हिडीओ समोर आला असून त्याबद्दल माहिती समोर आली आहे. ही बिल्डिंग शाहरुख खानचे घर ‘मन्नत’पासून काही अंतरावरच आहे. हा भाग अत्यंत अलिशान आहे. रणवीर व दीपिकाने दोन वर्षांपूर्वीच या बिल्डिंगमध्ये घर बुक केले होते. तेव्हापासून हे काम सुरु होते. तसेच बाळाचे आगमन झाल्यानंतर ते नवीन घरामध्ये शिफ्ट होतील अशी माहितीदेखील समोर येत आहे. दरम्यान बिल्डिंगचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही संपूर्ण बिल्डिंग त्यांची आहे का? असे प्रश्नदेखील नेटकऱ्यांना पडले आहेत.
दीपिका व रणवीर यांचे नवीन घर वांद्रे परिसरात असून शाहरुख त्यांचा शेजारी असणार आहे. अत्यंत सुंदर लोकेशन असून समुद्राचा सुंदर नजारादेखील बघायला मिळतो. ‘हाय राईज’ बिल्डिंगचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु होते. या घराबद्दल सांगायचे झाले तर, यासाठी तब्बल ११९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा व्यवहार देशातील महागड्या व्यवहारांपैकी एक मानला जात आहे. या इमारतीमध्ये १६, १७ व १८ व्या मजल्यावर फ्लॅट आहेत. घराचे एकूण क्षेत्रफळ ११,२६६ स्क्वेअर फुट आहे. तसेच १३०० स्क्वेअर फुटचे टेरेसदेखील आहे. याव्यतिरिक्त या इमारतीमध्ये १९ पार्किंग स्पेस आहे.
तसेच या फ्लॅटसाठी ७.१३ कोटी रुपये स्टॅम्प ड्यूटीदेखील भरण्यात आली आहे. तसेच यामध्ये वैयक्तिक जीम, स्विमिंग पूल, मनोरंजानासाठी वेगळी जागादेखील आहे. दरम्यान फ्लॅटचा व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने विचारले की, “संपूर्ण इमारत यांची आहे का”, तसेच अजून एकाने लिहिले की, “हे घर फक्त तीन लोकांसाठी आहे का?”. दरम्यान काही दिवसांपूर्वी दीपिकाने मुलाला जन्म दिला असल्याचे समोर आले होते. मात्र या वृत्तामध्ये काहीही तथ्य नसल्याचेदेखील समोर आले आहे.