Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता स्पर्धकांमध्ये वाद झाले असून दोन्ही गट एकत्र येऊन आता निक्की विरोधात लढाई करताना दिसत आहेत. भाऊच्या धक्क्यावर टीम ए चा पर्दाफाश झाल्यानंतर निक्कीने टीम ए मधून एक्झिट घेण्याचं ठरवलं. त्यामुळे टीम ए मधील स्पर्धक आणि टीम बी मधील स्पर्धक हे एकत्र येत निक्कीला भारी पडताना दिसत आहेत. निक्की व अरबाज यांच्यात अगदी पहिल्या दिवसापासून मैत्रीचं, प्रेमाचं नातं फुलताना पाहायला मिळालं आणि हे नातं साऱ्यांना आवडू लागलं होतं. मात्र भाऊचा धक्का झाल्यानंतर निक्कीने अरबाज बरोबरचेही मैत्रीचं नातं तोडून टाकलं.
तर टीम बी मधील आर्याच अगदी पहिल्या दिवसापासूनच टीम ए मधील कोणत्याही स्पर्धकाशी पटत नव्हतं. निक्की बरोबर तर तिचा जोरदार वाद झालेलाही पाहायला मिळाला. त्यानंतर टास्क दरम्यान ‘बिग बॉस’ यांनी निखिल व अभिजीतची जोडी जुळवली तर अरबाज व आर्याची जोडी या टास्क दरम्यान एकत्र आली. त्यामुळे आर्या अरबाजबरोबर बरेचदा घरातील सदस्यांबरोबर चर्चा करताना दिसली. अशातच आता आर्या बेडरुम एरियामध्ये असते तेव्हा ती अरबाज बरोबर निक्की बाबत चर्चा करताना दिसत आहे. यावेळी आर्या निक्की विरोधात अरबाजचे कान भरवताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आर्या अरबाजला बोलते, “मी स्वतः या परिस्थितीतून गेली आहे. मला असं तुला नाही पाहवत आहे. नको असं करु. तुला बोलायचं असेल तर बोल पण एक गोष्ट लक्षात ठेव तिने तुला यापुढे कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन तुला दगा दिला तर तू तिच्याशी सगळं क्लिअर कर. अरबाज तू सगळं क्लिअर कर. आणि हे लक्षात ठेव की, याच्यनांतर तू तिला हे नको करु असं सांगायलाही जाणार नाहीस, कारण जर तिला सांगितलं हे नको करु तर ती ते मुद्दाम करते”. यावर अरबाज फक्त ‘हो’ असं म्हणतो.
आता आर्याने निक्की विरोधात अरबाजचे कान भरले आहेत. आर्या व अरबाज सध्या टास्कमुळे एकत्र असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे बरेचदा दोघेही एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. शिवाय निक्कीला जळवण्यासाठी आर्या व अरबाज प्रेमाचं नाटक करतानाही दिसत आहे.