Anushka Sharma son akay photo : बॉलिवूडमधील अनुष्का शर्मा ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती अभिनयापासून दूर असलेली पाहायला मिळत आहे. अनुष्का व विराट हे दोघंही आता भारत सोडून लंडनला शिफ्ट झाल्याचेही समोर आले आहे. मात्र दोघांनी याबद्दल अधिकृत अशी कोणतीही घोषणा केली नाही. त्यांना वामिका व अकाय अशी दोन मुलं आहेत. २०२१ मध्ये अनुष्काने वामिकाला जन्म दिला. तिच्या जन्मानंतर अद्याप मुलीचा चेहरा त्यांनी उघड केला नाही. तर या वर्षी १५ फेब्रुवारी रोजी दूसरा मुलगा अकायला जन्म दिला. अकायच्या जन्माच्या वेळी ती लंडनमध्येच होती.
अनुष्का व विराट यांनी त्यांच्या मुलांना लाईमलाइटपासून दूर ठेवले आहे. वामिका व अकाय यांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत नाहीत आणि कोणालाही फोटो काढण्याची परवानगीदेखील देत नाहीत. अशातच आता तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये अकायची झलक पाहायला मिळाली आहे. अकायला आता सहा महीने पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने तिने काही फोटो शेअर केले. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केले असून रंगबेरंगी पॉप्सिकल्स असलेला एक बाऊल दिसत आहे. तसेच दुसऱ्या फोटोमध्ये काकडी गाजर असून अकायचा हातदेखील दिसत आहे.
या फोटोमध्ये अकायचा हात असून त्यावरही पीठ वैगरे लागलेले दिसत आहेत. त्यामुळे तो भरलेला बाउल मिळवण्याचा प्रयत्न करत आहे असंही दिसून येत आहे. अनुष्काने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनीही खूप पसंती दर्शवली आहे.
दरम्यान सध्या टी-२० वर्ल्ड कपनंतर विराटदेखील लंडनसाठी रवाना झाला होता. आता कोहली कुटुंबं कायमचेच लंडनमध्ये स्थायिक होणार अशा चर्चादेखील सुरु झाल्या. वामिकाच्या जन्मानंतर अनुष्का ही अभिनयापासून दूर गेलेली पाहायला मिळाली. तिने निर्मितीक्षेत्रातदेखील पाऊल ठेवले असून सध्या एका वेगळ्या रुपात ती पाहायला मिळत आहे. पण तिचे चाहते मात्र लवकरच अनुष्का चित्रपटामध्ये दिसावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.