‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मध्ये चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे निक्की तांबोळी. सध्या निक्की ‘बिग बॉस मराठी’ मध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे. बोल्ड, बिनधास्त असलेली ही अभिनेत्री खंबीर दिसत असली तरी तिने खऱ्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. एकूणच निक्की तांबोळीसाठी २०२१ हे वर्ष खूप भीतीदायक होते. लॉकडाऊन दरम्यान निक्कीला तिच्या जवळच्या लोकांना गमवावं लागलं. त्यापैकी एक तिचा लहान भाऊ होता. आपल्या भावाचा व्हिडीओ शेअर करताना, निक्की तांबोळीने तिच्या डोळ्यांत अश्रू आणत त्याच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली होती. (Nikki Tamboli Emotional Video)
या पोस्टच्या माध्यमातून निक्की तांबोळी हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आणि तिने सांगितले होते की, भावाच्या निधनाचे दुःख तिच्या मनात अजूनही जिवंत आहे. लहान वयातच आपल्या धाकट्या भावाचा निरोप घेतल्याचे दु:ख निक्की तांबोळी विसरु शकलेली नाही. भावाच्या मृत्यूनंतरही निक्कीला एकटं वाटत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावरुन पोस्ट केला होता. हा व्हिडीओ शेअर करताना, निक्कीने भावुक करणार कॅप्शनही दिलं होतं.
या शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं होतं की, “गत वर्ष माझ्यासाठी सर्वात मोठं, सर्वात कठीण आणि सर्वात दुःखी असणाऱ्या दिवसांचं होतं. कारण तू माझ्याबरोबर नव्हतास. लहान भावा मला तुझी खूप आठवण येत आहे. तुला जाऊन एक वर्ष झालं आहे. हे वर्ष एवढं मोठं नाही पण तुझ्याशिवाय जगायचं आहे म्हणून ते खूप मोठं वाटत आहे. काळ हा रोग बरा करणारा आहे असे मानले जाते पण एक वर्षानंतरही अगदी पहिल्या दिवसासारखीच वेदना मला होत आहे. या वेदनेतून पुढे जाण्यासाठी मी काहीही केले तरी मला सतत असं वाटत राहील की, मी तुला पुन्हा कधीच मिठीत घेऊ शकणार नाही”.
निक्कीनी ही पोस्ट शेअर करत पुढे लिहिले की, “भावा, तू मला खंबीर व्हायला शिकवलं आहेस. पण मी खंबीर न वागून तुला निराश करत आहे यासाठी मला माफ कर. तू आता इथे नाहीस हे मान्य करण्याइतपत मी कधीही खंबीर होणार नाही. ०४.०५.२०२१” . निक्की तांबोळीचे भावासाठीचे हे शब्द साऱ्यांना भावुक करणारे होते. निक्कीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये निक्कीचा भाऊ घराच्या बाल्कनीत फिरताना दिसत आहे. यावेळी त्याची प्रकृती ठीक नसल्याचेही दिसत आहे.