बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या खूप चर्चेत आहे. व्यावसायिक आयुष्याबरोरच खासगी आयुष्यामुळेदेखील अधिक चर्चेत असलेली पाहायला मिळते. मॉडेल असलेल्या उर्वशीने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मॉडेलिंग बरोबरच तिने अभिनयामध्येही आपले नशीब आजमावले आहे. तिची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे. अनेकदा ती अभिनय व मॉडेलिंग व्यतिरिक्त इतर काही कारणांमुळेही ती अधिक चर्चेत असते. सध्या ती ‘रब्बा करे’ या गाण्याच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. मात्र या गाण्याच्या प्रमोशनदरम्यान एका विचित्र घटनेची शिकार झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. (urvashi rautela troll)
उर्वशी ‘रब्बा करे’ या गाण्याच्या प्रमोशनसाठी ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ च्या सेटवर गेली होती. या शोच्या ग्रँड फिनालेवेळी तिच्या ड्रेसकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले. त्यामुळे तिच्या ड्रेसबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. या सगळ्या प्रकारामुळे ती आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.उर्वशीने काळ्या रंगाचा शीर ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. उर्वशी जशी पोज देण्यासाठी मागे वळली. तेव्हा तिचा ड्रेस फाटलेला दिसला. यामुळे सगळ्यांचे लक्ष गेले आणि समोर आलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
उर्वशीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “इतके मोठे लोक आणि फाटके ड्रेस घालतात”, तसेच दुसऱ्या एकाने लिहिले की, “अरे, हिची ड्रेसिंग कोणीतरी बदला आणि सुधारा”, तसेच अजून एकाने लिहिले की, “हिला स्टायलिस्टची गरज आहे”.
आणखी वाचा – आई झाल्यानंतर लेकीसह पहिल्यांदाच दिसली दीपिका पदुकोण, मुलीच्या गोड फोटोंनी वेधलं लक्ष
दरम्यान, उर्वशीचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला होता. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती फ्रेंच बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, “माझी फ्रेंच बोलण्याची कला. जेव्हा तुम्हाला फ्रांसमधून इतकं प्रेम मिळत असेल तेव्हा ती भाषा स्वीकारायलादेखील चांगले वाटते. फ्रेंचमध्ये नवीन सुरुवात करण्यासाठी धन्यवाद. माझे चांगले चाहते”. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.