‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व संपल्यानंतर घरातील सर्वच स्पर्धक एकमेकांच्या भेटी घेत आहेत. गेल्या काही दिवसांत इरीना व वैभव ही डीपी यांच्या गावी गेल्याचे पाहायला मिळाले. तसंच डीपी, वैभव, इरीना ही तिघे सूरजच्या गावी गेले होते. अशातच भाऊबीजनिमित्त अंकिता वालावलकरने डीपी दादांची भेट घेत त्यांना खास भेटवस्तूही दिली. त्यानंतर जान्हवीनेदेखील तिचा शब्द पाळला आणि ती भाऊबीजसाठी सूरज चव्हाणच्या गावी गेली होती. अशातच आता अंकिता वालावलकरदेखील सूरजच्या गावी गेली आहे. गेल्या काही दिवसांत बिग बॉसच्या घरातील अनेकांनी सूरजच्या गावी जात त्याची भेट घेतली होती. (Ankita Walawalkar Suraj Chavan Meet)
सर्वजण सूरजच्या भेटीसाठी आले असताना अनेकजण अंकिताच्या येण्याची वाट बघत होते. अशातच आता अंकिताही सूरजच्या गावी पोहोचली आहे. अंकिता सूरजच्या गावी गेल्याचा व्हिडीओ सूरजच्या युट्यूब वाहिनीद्वारे शेअर करण्यात आला आहे. यात अंकिता तिच्या होणाऱ्या नवऱ्यासह म्हणजेच कुणाल भगतबरोबर सूरजच्या गावी गेली आहे. या व्हिडीओमध्ये सूरज अंकिता व तिच्या होणाऱ्या नवऱ्याला घेऊन मरीआईच्या देवळात घेऊन येतानाचे पाहायला मिळत आहे. तसंच अंकिता सूरज व होणाऱ्या नवऱ्यासह मरीआईचे दर्शन घेते.
यादरम्यान, सूरज व अंकिता यांच्याबरोबर सूरजचे गावकरीही त्यांच्या मागे चालतानाचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. मंदिरात येताच अंकिता सूरजला मंदीर छान असल्याचे सांगते आणि पुढे म्हणते की, “बघ आले की नाही मंदिरात? तू इतका म्हणत होतास. आईचे तुझ्यावर कायम लक्ष आहे. अंकिता व सूरज यांच्या भेटीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अनेक चाहते अंकिता व सूरज यांच्या भेटीची वाट पाहत होते आणि त्यांची ही इच्छा आता पूर्ण झाली आहे.
आणखी वाचा – “गेली पाच वर्ष…”, मालिकेला निरोप देताना मधुराणीने अरुंधतीसाठी लिहिलं भावुक पत्र, म्हणाली, “तुझ्यामुळे मला…”
दरम्यान, सूरज चव्हाणला ‘बिग बॉस’च्या घरात सर्वांनीच पहिल्या दिवसापासून सांभाळून घेतलं. शिक्षण कमी असल्याने सुरुवातीला सूरजला टास्क समजून घेण्यात अडचणी निर्माण व्हायच्या. पण, पंढरीनाथ व अंकिताने त्याला या काळात खंबीरपणे साथ दिली. अंकिता व पॅडी यांनी सूरजला गेम व टास्कपलीकडे जाऊन त्याच्या खऱ्या आयुष्याबद्दलच्याही अनेक गोष्टी सांगितल्या आणि शिकवल्याही. यादरम्यान सूरजला नॉमिनेट केल्यामुळे अंकिता बऱ्याचदा ट्रोलही झाली. अशातच आता तिने सूरजची भेट घेतली आहे.