बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : आलिया व रणबीर कपूरच्या लेकीला फिरायला घेऊन गेली आजी, पण भलत्याच कारणामुळे लोकांनी सुनावलं अन्…; काय घडलं?

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 9, 2024 | 4:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ranbir-Alia daughter viral video

सोनी राजदान यांचा राहाबरोबरचा व्हिडीओ व्हायरल

Ranbir-Alia daughter viral video : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट्ट हे नेहमी चर्चेत असतात. दोघंही मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम करुन अभिनय क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र दोघाप्रमाणेच त्यांची मुलगी राहादेखील सतत चर्चेत असलेली पाहायला मिळते. राहाचे अनेक गोंडस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. रणबीर व आलियसह ती नेहमी दिसून येते. यावेळी सगळेच जण राहाची एक झलक कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी धावपळ करताना दिसून येतात.

रणबीर व आलियाच्या लाडक्या लेकीचा पुन्हा एकदा एक व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी ती आई-बाबाबरोबर नाही तर आजी सोनी राजदानबरोबर दिसून येत आहे. गाडीमधून राहा आजीबरोबर बाहेर जाताना दिसत आहे. तसेच एखाद्या लहान मुलाप्रमाणेच कारच्या खिडकीतून बाहेर वाकून बघण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या कॅमेरामन तिचे फोटो काढण्यासाठी पुढे येतात. मात्र सोनी यांचे कॅमेरामॅवर लक्ष जाताच त्या राहाला आत घेतात आणि तिला झाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

आणखी वाचा – अनुष्का शर्माने पहिल्यांदाच दाखवली लेकाची झलक, सहा महिन्यांचा चिमुरडा करत आहे ‘हे’ काम, फोटो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सोनी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, “इतकं तर रणबीर व आलियादेखील करत नाहीत”, दुसऱ्या एका  नेटकऱ्याने लिहिले की, “आई-वडिलांपेक्षा आजीच जास्त नातीला लपवत आहे”, तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, “असं वाटत आहे की राहाला मनोरंजनसृष्टीमध्ये येऊ देणार नाहीत”. तसेच अजून एकाने लिहिले की, “ही तर दुसरी जया बच्चन आहे”.

आणखी वाचा – “लेखक कलाकार नाहीत का?”, ‘म्हाडा’च्या लॉटरीत लेखकांना स्थान नसल्यामुळे मराठी इंडस्ट्री संतप्त, अभिनेता म्हणाला, “सरकारी जाहिरात लिहायला…”

दरम्यान बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे त्यांच्या मुलांचा चेहरा माध्यमांसमोर आणत नाहीत. मात्र रणबीर व आलियाने असं केलं नाही. राहा जेव्हा एक वर्षाची झाली तेव्हा ख्रिसमसच्या वेळी पहिल्यांदाच मुलीला माध्यमांसमोर आणले होते. त्यावेळी राहाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.           

Tags: alia bhattraha kapoorranbeer kapoorsoni rajdan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Dhananjay Powar and Ghanshyam Darwade fight know the reason

Bigg Boss Marathi : आधी कुशीत जाऊन रडला आता डीपीशीच भांडणं करतोय छोटा पुढारी, दोघांमध्ये जुंपली अन्...; नक्की काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.