Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाला अगदी दणक्यात सुरुवात झाली. या नवीन पर्वाची सुरुवातच भांडणांनी व वादांनी झाली. निक्की व वर्षाताईंमधले राडे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. यानंतर रितेशने निक्कीला सुनावत त्यांची माफीही मागायला लावली. मात्र घरात पहिल्या दिवसापासून घरातील स्पर्धकांमध्ये वादावादी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. एकामागून एक स्पर्धक वाद घालत आहेत. निक्की-वर्षा, आर्या-जान्हवी यांच्या भांडणांनंतर आता घरात नवीन वाद होणार आहे आणि हा नवीन वाद म्हणजे घन:श्याम दरवडे व धनंजय पोवार यांचं भांडण. नुकत्याच आलेल्या एका नवीन प्रोमोमध्ये छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरवडे व डीपी दादा म्हणजेच धनंजय पोवार यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. (Bigg Boss Marathi 5 update)
कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात घन:श्याम व धनंजय यांची भांडण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कॅप्टनने घरातील स्पर्धकांना दिलेल्या कामावरुन ही भांडण झाल्याचे समजत आहे. कॅप्टन अंकिता वालावलकरने घरातील सर्व स्पर्धकांना घरातील काही कामे वाटून दिले आहेत. त्याच सांभाषणादरम्यान, धनंजय व घन:श्याम यांच्यात वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी धनंजय घन:श्यामला “तुमची कामे काय आहेत असं बोलतो. यावर तो “एक” असं म्हणतो.
यानंतर धनंजय त्याला “मगाशी विचारलं तेव्हा तोंड शिवलं होतं का?” असं म्हणतो. धनंजयच्या या बोलण्याचा घन:श्यामला राग येतो. यानंतर घन:श्याम धनंजयला असं “तोंड शिवलंय का म्हणजे ही कोणती बोलण्याची पद्धत आहे. ज्याची दिवसाआड ड्यूटी त्याला काही बोलायचं नाही” असं म्हणतो. यानंतर धनंजय “मी केव्हाही बोलणार. मला वाटेल तेव्हा मी बोलणार” असं म्हणतो. घन:श्याम त्याच्या चेहऱ्यावर हात रोखून बोलत असताना धनंजय त्याला “हात सांभाळ” असं म्हणतो आणि त्यावर “तुमच्या तोंडाला हात लागलं नाही ना” असं म्हणतो.
पुढे धनंजय पुन्हा हात लागू देऊ नको असं म्हणतो. त्यावर घन:श्यामही त्याला “नाही लागणार” असं बोलतो. दरम्यान, घरातील इतर स्पर्धकांप्रमाणे आता डीपी दादा व छोटा पुढारी यांच्यातही वादाची ठिणगी पडली आहे. पण हा वाद विकोपाला जाणार की?, हा वाद थोडक्यावर निभावणार? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.