काही दिवसांपूर्वी दिग्गज अभिनेते राज कपूर यांची १०० वी जयंती साजरी करण्यात आली. त्यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. या सोहळ्यासाठी संपूर्ण कपूर कुटुंब हजर राहिले होते. तसेच बॉलिवूडमधील अनेक कलाकारदेखील उपस्थित राहिले होते. रेखा, विकी कौशलपासून जेनेलिया आणि शर्वरी वाघपर्यंत अनेक कलाकार मंडळी सहभागी झाले होते. काळ्या रंगाची साडी परिधान करुन जेनेलिया देशमुख खूपच क्लासी दिसत होती. ब्लॅक अँड व्हाइट ब्लेझरमध्ये रितेश देशमुखही खूप छान दिसत होता. राज कपूर यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त श्वेता बच्चननेही हजेरी लावली होती. यावेळी कपूर कुटुंबीयांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. (neetu kapoor ignore alia bhatt)
या कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडीओ सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत. यामध्ये नितू कपूर व आलिया भट्ट दिसून येत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नितू सून आलियाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. त्यामुळे सासू सूनेमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. दरम्यान या व्हिडीओमध्ये आलिया रणबीर कपूरबरोबर सगळी व्यवस्था करताना दिसत आहे. त्यावेळी आलिया नितू यांना एका ठिकाणी जाण्यास सांगते मात्र नीतू आलियाकडे दुर्लक्ष करुन पुढे निघून जातात. यामध्ये आलिया नीतूला मॉम मॉम अशी हाक मारताना दिसत आहे तसेच हातदेखील पकडायला जाते मात्र नीतू हात न पकडताच पुढे निघून जातात.
दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “कुटुंबाच्या कोणत्याही कार्यक्रमात सासूचे नखरे हे नेहमीच असतात”. तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “सासू ही सासू असते. मग ती आपली असो किंवा सेलिब्रिटीची”, अजून एकाने लिहिले की, “यांची सासूपण अशीच असते काय?”. दरम्यान नीतू यांच्या या कृतीवर नेटकऱ्यांनी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.
राज कपूर यांच्या १०० वी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी संपूर्ण कपूर कुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी पोहोचलं होतं. करीना कपूर व नीतू कपूर यांनी पंतप्रधानांबरोबरच्या भेटीचे फोटो शेअर केले होते. यावेळी करिश्मा कपूर, सैफ अली खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रिद्धिमा कपूर, आदर जैन, अरमान जैन, नीतू सिंग आणि रीमा जैन यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यही दिसले. सर्वांनी पीएम मोदींबरोबर पोज देत फोटो काढले, त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.