गेल्या दोन दशकांपासून मराठी व हिंदी सिनेविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारा स्टाइल आयकॉन म्हणजेच अभिनेता रितेश देशमुख. गेल्या अनेक वर्षांपासून रितेश मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. रितेशने मनोरंजन विश्वात सक्रिय असला, तरी तो पेशाने आधी आर्किटेक्ट होता. मात्र, त्याने आपल्या कारकिर्दीत वेगळा मार्ग निवडला. आजही तो आर्किटेक्ट आहे आणि स्वतःची इंटिरिअर डिझायनिंग कंपनीही चालवतो. पण, यानंतरही त्याने चित्रपटांमध्ये आपलं स्थान पटकावलं आहे. अशातच आज रितेश त्याचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. रितेश देशमुख आज बॉलिवूडमधील यशस्वी स्टार्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. (Genelia Deshmukh wish Riteish Deshmukh)
रितेशने २००३ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट फ्लॉप झाला, पण या चित्रपटामुळे त्याला त्याची आयुष्यभराची जीवनसाथी मिळाली. ती म्हणजे जिनिलीया डिसूझा. रितेश आणि जिनिलीया डिसूझा हे बॉलिवूडचे आदर्श जोडपे म्हणून ओळखले जातात. दोघे सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात, सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. आणि त्यांच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच जिनिलीयाने लाडक्या नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
जिनिलीयाने रितेशबरोबरचा हटके फोटो शेअर केला आहे आणि या पोस्टसह तिने असं म्हटलं आहे की, “जर तुम्ही सर्वोत्तम मुलगा, सर्वोत्तम वडील, सर्वोत्तम भाऊ आणि सर्वोत्तम पती शोधत असाल तर तो माझ्याकडे आहे. प्रिय रितेश तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुझी आहे आणि यात कसलाच रिफंड नाही”. या फोटोला बॉलिवूडसह अनेक मराठी कलाकारांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच रितेशलाही त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा – महागड्या Birthday Gift साठी संतोष जुवेकर कुशल बद्रिकेला मॉलमध्ये घेऊन गेला पण…; घडलं काही भलतंच, Video Viral
दरम्यान, रितेश व जिनिलीया यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ मध्ये लग्न केले. रितेश आणि जेनेलिया यांना रियान आणि राहिल अशी दोन मुले आहेत. त्यांच्या या सुखी संसाराला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांची जोडी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. दोघेही महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणून लोकप्रिय आहेत.