विश्वसुंदरी व बॉलिवूड अभिनेत्री सध्या खूप चर्चेत असते. आजवर ऐश्वर्याने अनेक चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. अभिनयाबरोबरच जगभरात तिचे अनेक चाहते आहेत. मात्र सध्या ती चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली पाहायला मिळते. नुकतीच ती पॅरीस फॅशन वीक २०२४ साठी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी तिचे व तिची मुलगी आराध्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एअरपोर्ट वरुन येतानाचे व जातानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. मात्र लेकीला सतत एकत्र बघून नेटकऱ्यांना तिच्या शाळेबद्दल अनेक प्रश्न पडले. यामुळे ती अधिक चर्चेत राहिली आहे. (aishwarya rai on aaradhya bachchan)
काही दिवसांपूर्वी आराध्याला सतत एकत्र पाहून नेटकऱ्यांनी ऐश्वर्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. काहींनी सांगितले की, पूर्वी लोकांना तिच्या केसांची काळजी वाटत होती आणि आता त्यांना शाळेची चिंता वाटत आहे. एका यूजरने विचारले व्हिडीओ पाहून विचारले की, “आराध्या शाळेत कधी जाते?”. तर दुसऱ्याने विचारले की, “आराध्याला शाळा नाही का? अशातच आता अभिनेत्रीचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक पत्रकारानेच ऐश्वर्याला प्रश्न विचारला आहे.
ऐश्वर्या अबुधाबी येथील आयफा पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. तिला ‘पोन्नियन सेल्वान’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तिला पुरस्कार घेताना बघून लेकीला खूप आनंद झालेला दिसून आला. दरम्यान तिने यावेळी माध्यमांबरोबरदेखील संवाद साधला. यावेळी आराध्या सतत बरोबर असण्याबद्दल तिला प्रश्न विचारला. तो तिला आवडला नसल्याचे दिसून आले.
पत्रकाराने विचारले कि, “आराध्या नेहमी तुमच्याबरोबर असते. त्यामुळे खूप चर्चा होत आहेत. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल?”, त्यावर ऐश्वर्याने पत्रकाराला हात दाखवत थांबवलं आणि उत्तर दिले की, “ती माझी मुलगी आहे. ती नेहमीच माझ्याबरोबर असते”. अभिनेत्रीच्या या उत्तराने उपस्थितांनी टाळ्या-शिट्या वाजवल्या. याआधी देखील आराध्याच्या शाळेबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हा तिने सांगितले होते की, “आराध्याच्या शिक्षणावर काहीही परिणाम होणार नाही असं मी फिरण्याचं नियोजन करते”. ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.