Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या नवीन पर्वातील सर्वांचा आवडता व लक्षवेधी चेहरा म्हणजे सूरज चव्हाण. सूरजने आपल्या स्टाईलने प्रेक्षकांना चांगलच खिळवून ठेवलं आहे. त्याची प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असते. सोशल मीडियापासून सुरु झालेला त्याचा प्रवास आता ‘बिग बॉस मराठी’पर्यंत येऊन पोहोचला आहे. ‘बिग बॉस मराठी ५’ आधीचा सूरज हा अनेकांना माहीत नव्हता, त्याचे सोशल मीडियावरील अतरंगी रील्स आणि व्हिडीओ पाहून अनेकजण त्याला ट्रोलदेखील करायचे. मात्र या ट्रोलर्सकडे लक्ष न देता आपली लोकांना हसवण्याची जिद्द त्यालं इथवर घेऊन आली आहे. ‘बिग बॉस मराठी’मध्ये येऊन त्याची कधीही न पुढे आलेली बाजू प्रेक्षकांपुढे आली आहे.
‘बिग बॉस मराठी मध्ये येताच त्याची प्रत्येक कृती सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसली. या घरात येताच त्याने सर्वांची मनं जिंकली होती. यापैकी पुरुषोत्तमदादा पाटील हेदेखील सूरजची मदत करताना दिसले. पुरुषोत्तमदादा हे ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून पहिल्याच आठवड्यात बाहेर आले असले तरी त्यांनी बाहेर आल्यानंतर सूरजलं पाठिंबा देताना दिसले. आता ‘बिग बॉस मराठी ५’ शेवटच्या टप्प्यात आला असून या घरातील स्पर्धकांना घराबाहेरुन पाठींबा मिळत आहे आणि पुरुषोत्तमदादा यांनी सूरजला आपला पाठिंबा दिला आहे. अशातच त्यांनी नुकतीच सूरजच्या घरी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी सूरजच्या घरची परिस्थिती व त्याच्या आई-वडिलांचे जुने फोटोही शेअर केले.
पुरुषोत्तमदादा पाटील यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी सूरजच्या कुटुंबियांच्या भेटीचे काही खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी असंही म्हटलं आहे की, “मी आता सूरज चव्हाणच्या घरी आलो आहे. घरी आल्यावर त्याच्या आत्यांनी मला सूरजच्या आई-वडीलांचा फोटो दाखवला आहे. त्याच्या गावातले सगळे मित्र आणि नातेवाईक आता माझ्याबरोबर आहेत. यांना भेटून मला छान वाटत आहे. ‘बिग बॉस मराठी’मध्ये ज्या आत्या व बहीणींचा उल्लेख करण्यात आला, त्याच आता फक्त त्याच्याबरोबर आहेत. मी पण खूप भावुक झालो. की इतक्या प्रतिकुल परिस्थितीमध्येही तो कुठे डगमगला नाही. त्याची आत्या व त्याच्या बहीणी यांची त्याला कायम साथ लाभली. पण आज संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यावर प्रेम करत आहे. त्याचे आई-वडील त्याच्याबरोबर नाहीत पण हे फोटो बघून मला भरून आलं आहे”.
दरम्यान, पुरुषोत्तमदादा पाटील हे सूरजच्या गावी कीर्तनासाठी गेले असताना त्यांना सूरजच्या घरी जाण्याचा मोह आवरता आला नाही. असंही या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. तसंच यापुढे त्यांनी सूरजच्या श्रद्धास्थान असलेल्या मरीआईच्या देवळात जाणार असल्याबद्दलही या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. पुरुषोत्तमदादा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओलाअ प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.