शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दहशतवादी खलनायक असतात मुसलमान नाही”, इफ्तार पार्टीला गेलेल्या अदा शर्माचं विधान, ट्रोलर्सला उत्तर देत म्हणाली, “कोणताही दिवस…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 28, 2024 | 3:54 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ada sharma on twitter post

"दहशतवादी खलनायक असतात मुसलमान नाही", इफ्तार पार्टीला गेलेल्या अदा शर्माचं विधान, ट्रोलर्सला उत्तर देत म्हणाली, "कोणताही दिवस..."

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे अदा शर्मा. अदाने या चित्रपटात केलेल्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. आजपर्यंत अदाने अनेक गंभीर आशय असणाऱ्या चित्रपटामध्ये भूमिका करताना दिसली आहे. सध्या तिचा ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटातील भूमिकाकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. पण हा चित्रपट म्हणावी तशी कामगिरी करु शकला नाही. पण अशातच तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. (Ada sharma on twitter post)

नुकतीच अदा मुंबईमध्ये रमजान निमित्ताने राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीसाठी अदादेखील उपस्थित राहिली होती. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामध्ये मुलींना व महिलांना फसवून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याची गोष्ट सांगितली आहे. आता मात्र इफ्तार पार्टीमध्ये अदाला पाहून लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा – आदिती राव हैदरीने सुप्रसिद्ध अभिनेत्याबरोबर दुसऱ्यांदा थाटला संसार, पहिल्या घटस्फोटानंतर लग्नाचा निर्णय, विवाहाबाबत सत्य समोर

On odd and even days dear sir terrorists are villains . Not muslims.

— Adah Sharma (@adah_sharma) March 26, 2024

‘एक्स’वर ट्विट करत एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “ही किती फ्रॉड आहे! या लोकांसाठी इतर दिवशी मुसलमान असतात आणि त्यांच्या विरोधात चित्रपट बनवतात. पण काही दिवसांसाठी मात्र हे लोक त्यांना चांगले वाटत कारण त्यांना बिर्याणी खाण्यासाठी आमंत्रित केले जाते”.

आणखी वाचा – “मी हे पैशांसाठी…”, ‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर जेनिफर मिस्त्रीचं मोठं विधान, म्हणाली, “पाच लाख रुपये…”

नेटकाऱ्याच्या या विधानावर अदानेदेखील रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिले की, “प्रिय सर, कोणताही दिवस असला तरीही दहशतवादी खलनायक असतात, मुसलमान नाही”. त्यावर एका नेटकाऱ्याने प्रतिक्रिया दिली की, “मॅडम प्लीज, मुसलमानांच्या विरोधात प्रोपोगांडा असलेला चित्रपट बनवू नका. मी तुमचा मोठा चाहता होतो”. त्यावर अदाने उत्तर दिले की, “दहशतवाद्यांच्या विरोधात चित्रपट बनवला आहे. मला विश्वास आहे की तुम्हीही त्यांच्या विरोधात असाल”.

अदाच्या या प्रतिक्रियेवर अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे. दरम्यान तिचा ‘बस्तर-द नक्सल स्टोरी’ हा  चित्रपट अमरनाथ झा यांनी लिहिला असून सुदीप्तो सेनने दिग्दर्शन केले आहे. याचित्रपटात तिच्याबरोबर राइमा सेन, शिल्पा शुक्ला, यशपाल शर्मा आदी कलाकार समाविष्ट आहेत.

Tags: ada sharmamoviesocial mediaterroristthe kerla storyx post
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Aishwarya Rai and Abhishek Bachchan maybe shift in abroad with daughter Aaradhya

लेकीसह भारत सोडून दुसऱ्या देशामध्ये राहायला जाणार ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन, आराध्याला बच्चन कुटुंबियांपासूनही दूर ठेवणार कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.