शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Dunki Trailer : शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित ‘डंकी’चा ट्रेलर प्रदर्शित, काही मिनिटांमध्येच लाखो व्ह्युज, लक्षवेधी संवाद, विकी कौशलची झलक अन्…

अंकिता करगुटकरby अंकिता करगुटकर
डिसेंबर 5, 2023 | 12:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
movie dunki trailer out now

movie dunki trailer out now

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे चित्रपटांची चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहताना दिसतात.  यावर्षी त्याच्या ‘पठाण’ व ‘जवान’ चित्रपटांनी तर बॉक्स ऑफिसवर बरीच कमाई केली होता. आता त्यानंतर शाहरुख यावर्षीचा तिसरा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच त्याच्या ‘डंकी:ड्रॉप ४’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. शाहरुखने पोस्ट शेअर करत चाहत्यांबरोबर हा ट्रेलर शेअर केला आहे. चित्रपटाचा ट्रेलर सध्या चाहत्यांच लक्ष वेधून घेत आहे. चित्रपटात शाहरुखचा त्याच्या ‘पठान’, ‘जवान’ या चित्रपटातील लूकपेक्षा हटके अंदाजात पाहायला मिळणार आहे. (movie dunki trailer out now)

शाहरुखने त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट हा ट्रेलर शेअर केली आहे. याला कॅप्शन देत तो लिहितो, “ही गोष्ट ललटूपासून मी सुरु केली होती. याचा शेवटही मीच माझ्या मित्र परिवाराबरोबर करणार. डंकीचा ट्रेलर तुम्हाला राजू सरांच्या दूरदृष्टीतून सुरु होणारा प्रवास दाखवतो. हा चित्रपट तुम्हाला मैत्रीच्या वेडेपणापर्यंत घेऊन जाईल”, असं लिहीत त्याने चित्रपटाचा थोडक्यात आराखडा मांडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

आणखी वाचा – रणबीर कपूर-आलिया भट्टच्या लेकीने टाकलं पहिलं पाऊल, अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत नवऱ्याचंही केलं कौतुक, म्हणाली, “आमच्या मुलीला…”

ट्रेलरच्या सुरुवातीला चित्रपटाच्या कथेची सुरुवात १९९५पासून होते. राजकुमार यांच्या काल्पनिक सुंदर जगाची झलक ट्रेलरमधून प्रेक्षकांना पाहायला मिळते. ट्रेलरमध्ये शाहरुखचा ट्रेनमधील सीनही पाहायला मिळातो आहे. हा सीन पाहता त्याच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटाची आठवण चाहत्यांना नक्कीच झाली असेल. ट्रेलरची सुरुवात खूप जबरदस्त आहे जी चित्रपटाच्या कथेला पुढे वळण देण्यास पूरक ठरते. शाहरुखचं या चित्रपटात हार्डी हे पात्र दिसणार आहे. जो पंजाबमधील लालटू गावात पोहोचतो. जिथे त्याची मैत्री मनू, सुखी, बग्गू व बल्ली यांच्याबरोबर होते. या सगळ्यांच एकच स्वप्न असतं ते म्हणजे लंडनला जाणं. या व्हिडीओत सगळ्यांचे इंग्रजीचे वांदे असल्याचंही पाहायला मिळतं. विकी कौशलचाही हटके अंदाज यातून पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Video : धमाल-मस्ती, जंगी सेलिब्रेशन अन्…; बोमन इराणींच्या बर्थडे पार्टीला बायकोला घेऊन गेला जितेंद्र जोशी, म्हणाला, “तिचं स्वप्न…”

‘डंकी’ चित्रपटाच्या कथेत सगळी वेगवेगळ्या स्वभाव गुणांची पात्र सुंदररित्या एकत्र आणलेली दिसत आहेत. त्यात त्यांच्या मैत्रीचा अद्भूत प्रवास पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात या मित्रांची पंजाबमधून लंडनला जाण्यासाठीचे प्रयत्न त्यातील आव्हाने हे सगळं चित्रपटात रंजक वळण आणणारं आहे. यात दाखवलेली पात्र अगदी साधी दाखवण्यात आली आहे. ज्यांना फक्त सीमेच्या पार जायचं आहे. परदेशात जाण्याची इच्छा पुढे त्यांना हातात बंदूक घेण्यासाठी भाग पाडते ही या कथेतील रंजक बाब आहे. शाहरुखसह या चित्रपटात तापसी पन्नू, अभिनेते बोमन इराणी, विकी कौशल, विक्रम कोचर व अनिल ग्रोव्हर हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहता प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढलेली पाहायला मिळत आहे.

Tags: bollywood actormovie dunkishahrukh khantrailer out nowupcoming rajkumar hirani
अंकिता करगुटकर

अंकिता करगुटकर

अंकिता करंगुटकर या इट्स मज्जा ऑनलाईनमध्ये रिपोर्ट पदावर कार्यरत आहे. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या घडामोडींच्या वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठामधून त्यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (एमएसीजे) ही पदवी मिळवली. विद्यापीठात शिकत असताना ‘जय महाराष्ट्र’मध्ये इंटर्नशीप केली. त्याचबरोबर ‘तरूण भारत, गोवा’ याठिकाणी तीन महिने काम केलं आहे. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Video : …अन् मन्नारा चोप्राने अंकिता लोखंडेच्या तोंडावर फेकली कॉफी, अभिनेत्री नवऱ्यासमोर ढसाढसा रडली, म्हणाली, "अशा लोकांबरोबर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.