बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित हा चित्रपट १ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटातील रणबीरच्या दमदार अभिनयाची सर्वत्र चर्चा होताना दिसते. प्रेक्षकांकडून त्याचं भरभरून कौतुक होत आहे. रणबीरची पत्नीही त्याचं तोंडभरून कौतुक करताना दिसते. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेत्री आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत रणबीरसह लेकीचंही कौतुक केलं आहे. तिने खास फोटो शेअर करत सुंदर कॅप्शन लिहिलं आहे. (Alia bhatt share a post for ranbir and raha)
आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत रणबीरला त्याच्या चित्रपटाच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तिने ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या प्रमोशनामधील एक फोटो शेअर करत तिने सुंदर असं कॅप्शन लिहिलं आहे. आलिया लिहितेस “या सगळ्यात तू कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्याच्या मागे आहेस. तू तुझ्या कलेला संयम, शांतता व प्रेम देतोस. तेच प्रेम तू आपल्या कुटुंबालाही देतोस. एक कलाकार म्हणून एवढं यश मिळवल्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. खरतर आपल्या मुलीचं अभिनंदन जिने आज पहिलं पाऊल टाकलं आहे. तिने आपल्या प्रदर्शनातून आम्हा सगळ्यांना पूर्णपणे चकित केलं आहे. यासगळ्यात बाकी सगळं सोपं करण्यासाठी माझ्या या लहान ‘अॅनिमल’चं खूप खूप अभिनंदन”, असं लिहीत तिने याबरोबर लाल हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
आलियाने नुकतीच ‘अॅनिमल’च्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी हजेरी लावली होती. यावेळी तिच्या कपड्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आलियाने या चित्रपटातील रणबीरची व्यक्तिरेखेचं चित्र टी-शर्टवर घातलं होतं. यातून तिने रणबीरच्या चित्रपटाला विशेष शुभेच्छा दिल्या. आलियाचा हा लूक चाहत्यांना बराच आवडला होता.
या चित्रपटात रणबीरबरोबर अभिनेत्री रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात रणबीर व रश्मिकाची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली. या चित्रपटात अभिनेता बॉबी देओल, अनिल कपूर यांचा हटके अंदाज चाहत्यांच लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाची कथा बाप व मुलाच्या नात्याभोवती फिरते. चित्रपटाने प्रदर्शित होताच बरेच रेकॉर्ड मोडले आहेत. आता हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.