Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’च्या घरात सध्या स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या शोमध्ये अंकिता लोखंडेची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अशातच पुन्हा एकदा अंकिता लोखंडे समोर आला आहे. या शोमधील दोन लोकप्रिय स्पर्धकांमध्ये जोरदार मारामारीही पाहायला मिळाली. अंकिता लोखंडे व मन्नारा चोप्रा यांच्यातील लढत थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. या शोच्या आगामी भागात पुन्हा एकदा प्रेक्षकांना मन्नारा व अंकिता यांच्यातील जबरदस्त लढाई पाहायला मिळणार आहे.
नुकताच या शोचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये मन्नारा व अंकिता एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांकडूनही त्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला प्रोमो पाहिल्यानंतर अनेक नेटकरी मन्नारा चोप्रावर नाराज होताना दिसत आहेत.
अंकिताने तिचा पती व सह-स्पर्धक विकी जैन यांच्याकडे मन्नाराबद्दल तक्रार करताना दिसले. अंकिता विकीला म्हणते “ती मुलगी माझ्यावर अत्याचार करते. तिला असे वाटते की ती जे करत आहे ते खूप चांगलं आहे. पण, तसं नाही आहे”, असं पतीसमोर बोलून अंकिता भावूक होते आणि रडू लागते. अंकिता पुढे म्हणाली आहे,”ती मला खूप क्रूर वाटते. मला घरी जायचे आहे विकी, प्लीज काहीतरी कर. मी इथे अशा लोकांबरोबर राहू शकत नाही” असंही ती विकीसमोर बसून बोलते.
त्यानंतर शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये स्पर्धकांना एक टास्क देण्यात आलेला पाहायला मिळत आहे. या टास्क दरम्यान, अंकिता मन्नारा चोप्राला नॉमिनेट करते आणि म्हणते, “हे स्पष्ट आहे की तुला मी आवडत नाही आणि मला तू आवडत नाहीस म्हणून मला हे शत्रुत्व कायम ठेवायचे आहे. मी तुला नॉमिनेट करत आहे.” असं म्हणत ती मन्नाराच्या अंगावर कॉफी फेकते. त्यानंतर मन्नारा चोप्राही अंकिताला नॉमिनेट करते, ती अंकिताला म्हणते, “मला असं वाटत ही ज्या लोकांबरोबर असते त्यांच्याबरोबर मुळात ती नाहीच आहे, त्यामुळे मला हिच्या बाबतीत फार खात्री आहे” असं म्हणत मन्नारा चोप्रा अंकिता लोखंडेच्या तोंडावर कॉफी फेकते.