बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदूकोण सध्या खूप चर्चेत आहे. ८ सप्टेंबर रोजी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सोशल मीडियावर दीपिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट परत याबद्दलची माहिती दिली. तिच्या या पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळाली असून हॉलिवूड व बॉलिवूडमधील अनेक मोठमोठ्या कलाकारांनी तिला व रणवीर सिंहला शुभेच्छा दिल्या आहेत. मुलीचा जन्म झाल्यानंतर दीपिकाला भेटण्यासाठी भारतातील श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांनी उपस्थिती दर्शवली होती. रुग्णालयात जातानाचा त्यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. (shahrukh khan meet deepika padukone)
दीपिका व तिच्या लेकीला भेटण्यासाठी बॉलिवूड किंग शाहरुख खानही उपस्थित राहिलेला दिसून आला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर दिसून आला आहे, दीपिका अजून रुग्णालयातून घरी सोडण्यात आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार रणवीर तिची खूप काळजीदेखील घेत आहे. समोर आलेल्या व्हीडीओमध्ये शाहरुख त्याच्या पांढऱ्या रंगाच्या अलिशान गाडीमधून मुंबईतील एच एन रीलायंस फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये पोहोचला. रात्री तो ‘मन्नत’ बंगल्यातून रवाना झाला.
दीपिकाने शाहरुखबरोबर ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ते अनेक चित्रपटांमध्ये एकत्रितपणे दिसून आले होते. त्यांच्यामध्ये असलेला बॉन्डदेखील नेहमी दिसून आला आहे. तसेच याआधी दोघंही ‘जवान’ या चित्रपटामध्ये दिसून आले होते. यामधील त्यांची केमेस्ट्री अधिक पसंतीस मिळाली होती. शाहरुख व दीपिका हे खूप चांगले मित्र आहेत.
सध्या दीपिकाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ती खूप काळ मॅटर्निटी लिव्हवर असणार आहे. २०२५ नंतरच ती आता चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. पुन्हा काम करण्यास सुरुवात केल्यानंतर ती ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शूट करण्यास सुरुवात करणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हसनदेखील काम करताना दिसणार आहेत. तसेच रणवीरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो आता ‘सिंघम अगेन’ व ‘डॉन ३’मध्ये दिसून येणार आहे. यामध्ये फरहान अख्तर व कियारा आडवाणीदेखील दिसणार आहे.