‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे पारू व आदित्यने आबासाहेबांचे मन जिंकलेलं असतं. प्रियाच्या वडिलांचे मन जिंकून प्रीतमचा हात मागण्याचा त्यांचा हेतू लवकरच पूर्ण होणार असतो. प्रियाच्या घरी गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु असते. तेव्हा रीतीनुसार नवऱ्याला सुगंधी तेल लावत त्याला तेलाने मालिश करण्याची पद्धत असते. त्यामुळे मावशींच्या सांगण्यानुसार पारू आदित्यला तेलाने मालिश करायला जाते. तेव्हा आदित्य लाजत असतो त्यावेळेला मावशी म्हणतात की, ही एक रीतच आहे आणि ती पूर्ण करावीच लागेल. (Paaru Serial Update)
शिवाय गणपतीची पूजा ही पारू व आदित्यला करायची असते त्यामुळे त्यांच्यावर खूप मोठं दडपण आलेलं असतं. मावशींच्या सांगण्यावरुन पारू आदित्यला मालिश करुन देत असते. तर इकडे प्रीतमलाही प्रिया मॅडमकडून मालिश करुन घ्यायची असते कारण बायकोने पतीची सेवा करणं ही रीत असते, त्यामुळे प्रीतमची ही इच्छा असते त्यानुसार प्रिया मॅडम ही प्रीतमच्या समोर येतात आणि त्याला मालिश करु लागतात. तितक्यात तिथं आबासाहेब प्रीतमला आणि पारूला शोधत शोधत आलेले असतात ते गच्चीवर येतात आणि खाली पाहतात तर तिथं प्रिया मॅडम उभ्या असतात आणि पारू, आदित्य व प्रीतम एका बाजूला लपलेले असतात.
आणखी वाचा – “गांव कधी बघतोय असं झालंय”, गावच्या आठवणीत सूरज चव्हाण भावुक, मन मोकळं करत म्हणाला, “स्वतःवर नियंत्रण…”
प्रिया मॅडमना पारू सांगते की, तुम्ही फक्त हावभाव करा मी माझ्या आवाजात बोलते. तेव्हा पारू सांगते की ते सामानाला बाहेर गेलेत आले की पाठवते, असं बोलते. तेव्हा आबासाहेब चालेल असं म्हणून तिथून निघून जातात. त्यानंतर प्रिया मॅडम रितीनुसार होणाऱ्या नवऱ्याला म्हणजेच प्रीतमला मालिश करतात. हे सगळं सुरु असताना एकीकडे किर्लोस्कर बंगल्यात दिशाची धावपळ सुरु असते की, पारू, आदित्य, प्रीतम नेमके कुठे गेले आहेत त्याचा शोध घ्यावाच लागेल आणि त्यानुसार ती त्यांच्या मागावरच असते. दामिनी आणि दिशा मिळून प्लॅनही तयार करत असतात.
तर इकडे प्रिया आणि तिचा भाऊ गणेशोत्सवाची तयारी करत असतात. यावेळी प्रिया खूप सुंदर नटलेली असते हे पाहून प्रीतमला रहावत नाही तो प्रियाला खाणाखुणा करु लागतो. तेव्हा प्रिया त्याला शांत राहायला सांगते त्यानंतर प्रियाच्या भावाचं लक्ष जाऊ नये म्हणून प्रीतम लपतो मात्र प्रियाचा भाऊ शेवटी प्रीतमला पाहतोच. आता प्रीतम आणि प्रियाचं हे सत्य प्रियाच्या भावासमोर येणार का?, हे सारं पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.