सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धक्काबुक्की केली, फोनही हिसकावला अन्…; लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्रीला आला वाईट अनुभव, व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 13, 2024 | 12:33 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Simran Budharup Shared Shocking Video of Lalbaugcha Raja Darshan

लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेल्या टीव्ही अभिनेत्रीला मिळाली वाईट वागणूक

सध्या सर्वत्र गणेशोत्सव अगदी उत्साहात साजरा होताना पाहायला मिळत आहे. मुंबईतील गणपती बाप्पांना पाहण्यासाठी भाविक लांबून येताना दिसतात. मुंबईत प्रशस्त व नावाजलेल्या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविक दुरुन येत रात्रं-दिवस लाईनमध्ये उभे राहताना दिसतात. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. सर्वसामान्यांबरोबर आता कलाकार मंडळीही लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेण्यासाठी जाताना दिसतात. अशातच हिंदी टेलिव्हिजन विश्वातील एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. (Simran Budharup Shared Shocking Video of Lalbaugcha Raja Darshan)

ही अभिनेत्री म्हणजे सिमरन बुधरूप. पंड्या स्टोअर या मालिकेतून सिमरन घराघरांत पोहोचली. नुकतीच सिमरनने तिच्या आईबरोबर लालबागच्या राजाचे दर्शन घेतले मात्र दर्शनावेळी तिला वाईट अनुभव आल्याचे समोर आले. दर्शनासाठी उभे असताना अभिनेत्रीसह व तिच्या आईसह धक्कादायक प्रकार घडला. सिमरनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत दर्शनाला जाण्याचा अनुभव खूप वाईट होता, असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तू या घरातील घाण आहेस”, जान्हवी किल्लेकर व निक्की तांबोळीमध्ये तुफान राडा, चॅलेंजही केलं अन्…; कोण कोणावर पडणार भारी?

View this post on Instagram

A post shared by Simran Budharup ???????? (@simranbudharup)

सिमरनने व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत त्याखाली कॅप्शन देत असं म्हटलं आहे की, “आज मी माझ्या आईबरोबर लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते, पण तेथील कर्मचारी आमच्याशी ज्या पद्धतीने वागले त्यामुळे आमचा अनुभव वाईट ठरला. माझी आई फोटो काढत असताना कर्मचाऱ्यांपैकी एका व्यक्तीने तिचा फोन हिसकावून घेतला. ती रांगते माझ्या मागे होती. तिने दर्शनासाठी जास्त वेळ घेतला नव्हता. तिच्यापुढे मी असल्याने मी दर्शन घेत होते आणि ती मागे असल्याने फोटो काढत होती. आईने फोन परत मागण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी तिला धक्काबुक्की केली”.

आणखी वाचा – “गांव कधी बघतोय असं झालंय”, गावच्या आठवणीत सूरज चव्हाण भावुक, मन मोकळं करत म्हणाला, “स्वतःवर नियंत्रण…”

यापुढे तिने असंही म्हटलं आहे की, “मी मध्ये पडताच बाऊन्सर्सनी माझ्याशी गैरवर्तन केलं. मी त्यांच्या वर्तणुकीचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केल्यावर त्यांनी माझाही फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. “असं करु नका, तुम्ही काय करताय?”, अशी विनंती त्यांना केली. मी अभिनेत्री आहे हे कळल्यावर ते परत गेले. ही घटना जागरुकता आणि जबाबदारीची गरज असल्याचं दर्शवते. सकारात्मकता व आशीर्वादासाठी चांगल्या हेतूने लोक अशा ठिकाणी भेट देतात. त्याऐवजी, आम्हाला आक्रमकता, अपमान सहन करावा लागला. गर्दीवर नियंत्रण ठेवणं आव्हानात्मक आहे, हे मला माहीत आहे. पण भाविकांशी कोणतेही गैरवर्तन न करता सुव्यवस्था राखणे ही कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे”, असंही सिमरन म्हणाली. “घडलेल्या प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी मी हा व्हिडीओ शेअर करत आहे. या व्हिडीओनंतर आयोजक व कर्मचारी इथे येणाऱ्या भाविकांशी आदराने वागतील अशी आशा आहे”, असेही सिमरनने म्हटलं

Tags: Lalbaugcha Raja DarshanLalbaugcha Raja Darshan shocking videoSimran Budharup
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
neha shitole on bigg boss marathi

"हिंसा निंदनीयच आहे...", निक्कीला कानाखाली मारल्यानंतर मराठी अभिनेत्रीचा खोचक टोला, म्हणाली, "जिंकण्यासाठी..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.