बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान आपला नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच त्याच्या ‘जवान’ या नव्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंगही सुरू झाली आहे. चित्रपटात शाहरूख खानसह नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा व प्रियामणी हे पण दिसणार आहेत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता आणखी वाढली आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमधून शाहरुखचा वेगळा लूक पहायला मिळत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तो दुबईतील बुर्ज खलिफा येथेही लाँच करण्यात आला. त्यावेळी शाहरुखने सगळ्यांना चित्रपट पाहण्याची विनंती केली. यावेळी त्याने चित्रपटातील त्याचे लूक व त्याच्या टक्कलाबाबत भाष्य ही केलं. वेगळ्या अंदाजात त्याने प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची विनंती केली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.(Shahrukh on bald look)
शाहरुखच्या फॅन क्लब पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. ज्यात त्याने ‘जवान’ चित्रपट पाहण्याची विनंती केली. यावेळी त्याने टक्कल हा विषय विनोदी पद्धतीने सांगितल. “मी तुमच्यासाठी टक्कलसुद्धा केलं आहे. यासाठी तुम्ही सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन चित्रपट बघा. आमच्या चित्रपटात तुम्हाला आवडेल असं सगळं काही आहे. मला चित्रपटात ६-७ लूकही बदलावे लागले आहेत. आणखी एक गोष्ट म्हणजे चित्रपटासाठी मी टकला झालो ही गोष्ट माझ्या आयुष्यात मी पुन्हा कधीही करणार नाही. टकलं होणं हे माझ्या आयुष्यातील पहिलं व शेवटचं आहे”.
वाचा – जवान चित्रपटासाठी शाहरुखने केलं टक्कल!(Shahrukh on bald look)
King Khan talking about Jawan
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) August 31, 2023
Jawan has the aspects for all the people!✨????
Watch it with family, everyone will love one or other aspects of the movie ✨❤️@iamsrk @RedChilliesEnt @Atlee_dir @yrf @SRKUniverseUAE #Jawan #JawanTrailer #JawanCelebrationAtBurjKhalifa… pic.twitter.com/AwW6hicSrH
हा चित्रपट तामिळ, तेलगू तसेच हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. शाहरुखचा हा पहिला असा चित्रपट असणार आहे जो अॅक्शनसह प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणार आहे. शाहरुख म्हणाला की, “या चित्रपटातून आम्ही तुमचं मनोरंजन करत आहोत. त्यात कोणत्याही भाषा, धर्म, जाती, रंग, पंथ या कशाचाच भेद नाही आहे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या कुटुंबासह या चित्रपटाच्या मनोरंजन सोहळ्यात सामिल होऊया आणि हा सोहळा साजरा करुया. त्याच दिशेने आमचं हे पहिलं पाऊल आहे”.
SRK is absolutely electric as he performs on Zinda Banda during the #JawanCelebrationAtBurjKhalifa ⚡????????@iamsrk @RedChilliesEnt @Atlee_dir @yrf @SRKUniverseUAE #Jawan #JawanTrailer #ShahRukhKhan #BurjKhalifa pic.twitter.com/THFUpgDC7P
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) August 31, 2023
आणखी वाचा – ठुमके, अदा अन्…; गौतमी पाटीलचं नवं गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर तरुणाईचा उदंड प्रतिसाद
जवान हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. ज्यात शाहरुखसह सान्या मल्होत्रा, ऋषी डोगरा, प्रियामणी व दीपिका पदुकोणही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंगही सुरू झाली असून आतापर्यंत ४० हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे.