मराठी मनोरंजन विश्वातील हँडसम अभिनेता गश्मीर महाजनी अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मालिका व चित्रपटांमध्ये झळकलेल्या गश्मीरने मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याने साकारलेल्या प्रत्येक भूमिकांना चाहत्यांची पसंती लाभली आहे. मात्र, वडील अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने गश्मीर पुरता कोसळला होता. त्यामुळे त्याने काही काळासाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. दरम्यान, गश्मीर या सगळ्यातून सावरताना दिसत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तो त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत आहे. (Gashmeer Mahajani New Movie Announcement)
अभिनेता गश्मीर महाजनी आता पुन्हा एकदा सिनेसृष्टीत परतण्यास सज्ज झाला आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून त्याने ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे. गश्मीर लवकरच एका ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे. त्याची घोषणा येत्या काही दिवसांत करणार असल्याची माहिती त्याने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. (Gashmeer Mahajani New Movie Announcement)
गश्मीरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याची ‘सरसेनापती हंबीरराव’मधील काही झलक दिसत आहे. या व्हिडिओवरून अभिनेता गश्मीर महाजनी नेमकी कोणती भूमिका साकारणार, हे समोर आले नसले. तरी तो पुन्हा एकदा महाराजांची भूमिका साकारणार, हे मात्र निश्चित झाले आहे.
हे देखील वाचा – “झुकेगा नही साला…”, लग्नानंतरच्या पहिल्या मंगळागौरसाठी हार्दिकचा अक्षयासाठी पुष्पा स्टाईल उखाणा, व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, या व्हिडिओसह लिहिलेल्या कॅप्शनमध्ये गश्मीर म्हणतोय, “पुन्हा एकदा तोच प्रवास ????????… लवकरच…”. त्याच्या या पोस्टवर अमृता खानविलकर, पूजा सावंत या कलाकारांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर चाहतेही अभिनेत्याला महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुर असल्याचे कमेंटद्वारे व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, गश्मीरने हा चित्रपट एक साहसपट असल्याचे त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये सांगितले आहे. शिवाय, कमेंट्स आणि स्टोरीद्वारे चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना “बाकी माहिती योग्य वेळी देईन” असं उत्तर त्याने दिलं आहे. त्याचबरोबर, ही भूमिका साकारण्यासाठी आपण उत्सुक असल्याचेही बोलला आहे.
हे देखील वाचा – …म्हणून अतिशा नाईकने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका अर्धवट सोडली, म्हणाली, “आई खूप आजारी होती आणि…”
अभिनेता गश्मीर महाजनीने ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्याच्या या दोन्ही भूमिकांना सिनेरसिकांचे विशेष प्रेम मिळाले आहे. आता या नव्या चित्रपटातून गश्मीरला पुन्हा एकदा महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळणार असून चाहते त्याला या भूमिकेत पाहण्यासाठी आतुरलेले आहेत.