सध्या सर्वत्र नवीन वर्षांच्या स्वागतासाठी संपूर्ण जगभरात लगबग सुरु आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सज्ज आहे. अशातच आता भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी म्हणजे गुजरात येथील जामनगर येथे मोठ्या उत्साहात नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी तयार आहेत. या पार्टीसाठी आता बॉलिवूडमधील कलाकार मंडळी हजर राहिले आहेत. शाहरुख खान, पत्नी गौरी खान व मुलगा अबराम खान यांना जामनगर येथे पोहोचले आहेत. कडेकोट बंदोबस्तामध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (shahrukh khan at jamnagar)
शाहरुख, गौरी व अबराम हे जामनगर एअरपोर्टवर पोहोचले. यावेळी सुहाना खान व आर्यन खान दिसून आले नाहीत. खान कुटुंबाला कॅप्चर करण्यासाठी माध्यमांमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी शाहरुखने हुडी घातली होती. तसेच त्याने चेहरादेखील लपवला आहे. शाहरुखने चेहरा लपवलेला व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.
शाहरुखने चेहरा लपवलेला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “तोंड का लपवलं आहे? जसं काय आम्ही बघण्यासाठी उतावळे झालो आहोत”. तसेच एकाने लिहिले की, “मुलगा ड्रग्स पार्टी करत असेल तर बापाला तोंड लपवावंच लागेल ना”. दरम्यान या प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
जामनगर येथे पोहोचण्याआधी शाहरुख कुटुंबासहित अलिबागवरुन परतलाहोता. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखने अलिबाग येथील अलिशान फार्महाऊसवर विकेंड घालवला. यावेळी शाहरुखच्या हातात त्याचा पाळीव श्वान असलेलादेखील दिसत आहे. मात्र इथे त्याने हुडीमध्ये चेहरा लपवला आहे. अंबानी यांच्या पार्टीसाठी अभिनेता सलमान खानदेखील जबरदस्त परफॉर्म करताना दिसून आला होता. यावेळी डान्स परफॉर्म करताना सलमानने कोकिला अंबानी यांची गळाभेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे.