‘बडे अच्छे लगते है’ ही मालिका अधिक लोकप्रिय ठरली. या मालिकेमधील राम व प्रिया या भूमिका अधिक आवडीच्या होत्या. राम कपूर व साक्षी तन्वर यांच्या मुख्य भूमिका बघायला मिळाल्या. दोघांच्याही जोडीला प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळाले. या मालिकेचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आशा अनेक चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या. मात्र आता ही मालिका नाही तर राम आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. गोलू-मोलू असलेल्या रामचा बदललेला लूक बघायला मिळत आहे. एका कार्यक्रमादरम्यान राम दिसून आला होता. त्यावेळी त्याला बघून सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. (ram kapoor transformation)
राम सध्या ५१ वर्षाचे आहेत. ‘युधरा’ या चित्रपटामध्ये तो शेवटचा दिसून आला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी सोशल मीडियावर ब्रेक घेतला होता. मात्र काही तासांपूर्वी त्यांनी शेअर केला आहे. ज्यामुळे सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. काही तासांपूर्वी राम यांनी पत्नी गौतमी कपूरबरोबर एक फोटो शेअर केला यामध्ये त्यांनी तब्बल ४२ किलो वजन कमी केलेले दिसून येत आहे. यामुळे अनेकांनी राम यांचे कौतुकदेखील केले आहे.
राम यांनी एक फोटो शेअर करत लिहिले की, “हेलो मित्रांनो, इन्स्टाग्रामवरुन ब्रेक घेतला होता. त्यासाठी मी सगळ्यांची माफी मागतो. मी स्वतःवर काम करत होतो”. या फोटोमध्ये राम यांनी कमालीचे वजन कमी केलेले दिसून आले. तसेच त्यांच्या या फोटोवर अनेक कलाकारांनीदेखील प्रतिक्रिया देत कौतुक केले आहे. एका चाहत्याने प्रतिक्रिया देत लिहिले की, “खूप मोठा बदल झालेला आहे. मला तुमची ‘बडे अच्छे…’ ही मालिका अधिक आवडते”.
तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “ठीक आहे. आता आम्हाला समजलं की हे इतकं रहस्य का होतं ते”. तसेच एकाने लिहिले की, “आमचा लहानपणीचा क्रश पुन्हा एकदा सेक्सी झाला आहे”. तसेच काही लोकांनी राम यांचा आधीचा लूक चांगला होता असेही लिहिले आहे.