अभिनेता सलमान खान सध्या खूप चर्चेत आहे. एनसीपी नेते व सलमानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बॉलिवूडमधील सगळ्याच कलाकारांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या. अशातच आता काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील एका इसमाने सलमान व बाबा सिद्दीकींचा मुलगा झिशान सिद्दीकीला फोन करुन जीवे मारण्याच्या धमकीबरोबरच पैशांचीदेखील मागणी करण्यात आली. अशातच आता सलमानबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. सलमानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. १० दिवसांत सलमानला ही तिसऱ्यांदा धमकी मिळाली आहे. हा मेसेज मुंबई पोलिस कंट्रोल रुमला मिळाला असून ही धमकी स्वतः लॉरेन्स बिश्नोइ असल्याचे सांगण्यात आले आहे. (salman khan murder threat)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिस कंट्रोलला एक धमकी असलेला मेसेज मिळाला आहे. तसेच मेसेज पाठवणाऱ्याने लॉरेन्स असल्याचे सांगितले आहे. तसेच पाठवण्यात आलेल्या मेसेजमध्ये बिश्नोइ समाजाच्या मंदिरात जाऊन काळवीटाची शिकार केली. त्यामुळे सलमानने माफी मागावी किंवा ५ कोटी रुपये द्यावेत, असे लिहिण्यात आले आहे.
मेसेजमध्ये पुढे लिहिले की, “सलमान यापाकी काहीही करु शकला नाही तर त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. तसेच लॉरेन्स बिश्नोइ टोळी अजूनही सक्रिय आहे”. दरम्यान मुंबई पोलिस मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरु केला आहे.सध्या सलमान ‘सिकंदर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. ज्या महालात अर्पिता खानचे लग्न झाले तिथेच म्हणजे हैद्राबादमध्ये चित्रीकरण केले आहे. या व्यतिरिक्त तो ‘बिग बॉस १८’ चे चित्रीकरणदेखील करत आहे. सलमानचे खास मित्र तसेच एनसीपीचे नेते बाबा सिद्दीकीची हत्या करण्यात आले. त्यानंतर सलमानची सुरक्षादेखील वाढवण्यात आली.
दरम्यान, १९९८ साली सलमानने राजस्थान येथे काळविटाची शिकार केली होती. या प्रकरणी सलमानला तुरुंगाची हवादेखील खायला लागली होती. मात्र काही दिवसांतच त्याला जामीनदेखील मिळाला. या सगळ्यामुले लॉरेन्स बिश्नोइ सलमानचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे.