Irina Rudakova Dance Video : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ च्या पर्वातील सगळेच विशेष चर्चेत राहिलेले पाहायला मिळाले. ‘बिग बॉस’मुळे अनेक स्पर्धक लोकप्रियतेस आले. यंदाच्या पर्वाची ट्रॉफी बारामतीच्या सूरज चव्हाणने पटकावली. ‘बिग बॉस’मुळे परदेशी पाहुणी इरिना रुडाकोवा विशेष चर्चेत आली. ‘बिग बॉस’च्या घरात इरिनाने अगदी पाहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनात घर केलं होत. मराठी कळत असलं तरी नीट मराठी बोलता येत नव्हतं असं असलं तरी ती तिचा खेळ एकटी खेळत होती. फॉरेनर म्हणून ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यानंतर इरिनाने तिच्या प्रेमळ मराठी संवादाने प्रेक्षकांची मन जिंकली.
‘बिग बॉस मराठी’ संपल्यापासून सदस्यांचे फोटो व व्हिडीओ सातत्याने व्हायरल होतं असतात. महाराष्ट्रात सध्या इरिना फिरताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर इरिना वैभवसह सह्स्पर्धकांच्या भेटी घेत आहे. भाऊबीज निमित्त इरिनाने कोल्हापुरात जाऊन डीपीची भेट घेतली. ‘बिग बॉस’नंतर इरिना सोशल मीडियावर विशेष चर्चेत राहिली. सोशल मीडियावर इरिना बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती अनेक रील-व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
अशातच इरिना रुडाकोवालाच्या डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यामध्ये तिने गरब्याचा आउटफिट परिधान करून डान्स केला होता. ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ चित्रपटातील ‘नगाडा संग ढोल’ या दीपिका पादुकोणच्या गाण्यावर इरिना थिरकली होती. इरिनाच्या या व्हिडीओला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. शिवाय ‘बिग बॉस’मधील तिच्या सहस्पर्धकांनीही या व्हिडीओवर कमेंट करत तिचं कौतुक केलं.
आणखी वाचा – “घन:श्यामवर कोणी विश्वास ठेवू नये”, सूरजच्या लग्नावरुन जान्हवीचं भाष्य, म्हणाली, “आवडीची मुलगी…”
या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “आपली इरिना भारी, आपला वैभव भारी…आयला आपल्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सगळेच सदस्य लय भारी”. यावर इरिनाने हार्ट इमोजी दिलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, “गरबा संपला ताई. दिवाळी आली” असं गंमतीत म्हटलं आहे. या नेटकऱ्याला इरिना उत्तर देत म्हणाली, “हो मला माहित आहे”, असं म्हटलं आहे.