बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सलमानचे खास मित्र व राजकिय नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोइ गॅंगने स्वीकारली होती. त्यानंतर सलमानलादेखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यामुळे सलमानने त्याचे सर्व काम पुढे ढकलले होते. काही दिवस त्याने सगळ्याच कार्यक्रमाचे चित्रीकरण बंद केले होते. मात्र काही दिवसांपूर्वी खूप सुरक्षेततेमध्ये तो ‘बिग बॉस’च्या चित्रीकरणासाठी परतला. अशातच आता लॉरेन्सने त्याचे गुन्हे कबूल केले आहेत. त्याने सलमानला धमक्या देण्यामागील कारण स्पष्ट केले आहे.(lawrence bishnoi on salman khan)
काळवीट शिकार प्रकरणी सलमानवर राग असल्याचे बिश्नोइने स्पष्ट केले होते. या प्रकरणी त्याने समाजाची माफी मागावी. असेही तो म्हणत होता. मात्र आता त्याने यामागील खरे कारण स्पष्ट केले आहे. त्याने हे सगळं प्रसिद्धी मिळवण्यासाठी केले असल्याचे सांगितले. या प्रकरणी लॉरेन्सने ‘एबीपी न्यूज’बरोबर संवाद सांगला त्यावेळी त्याने सलमान धमक्या देण्यामागची कारणं स्पष्ट केले आहेत. लॉरेन्सने दिल्ली पोलिसांना दिलेल्या जबाबत हे सगळं प्रसिद्धीसाठी केले असल्याचे सांगितले आहे.
त्याने सांगितले की, “मला वासूदेव इराणी खून प्रकरणात अटक करुन जोधपुर येथे आणले होते. जेव्हा मला न्यायालयात हजर केले होते तेव्हा तिथे सलमानदेखील त्याच्या तारखेसाठी आला होता. सलमानने काळवीटाची शिकार केली होती आणि त्याला न्यायालयाकडून शिक्षा होत नव्हती त्यामुळे मी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मला केवळ माध्यमांमध्ये यायचं होतं आणि बिश्नोइ समाजात नाव मोठं करायचं होतं. सलमानला धमकी दिल्याप्रकरणी मला अटक केली होती”.
दरम्यान आता सलमानच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, त्याने ‘सिकंदर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केली आहे. तसेच ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामध्ये कॅमिओ रोलदेखील करणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते सध्या खूप खुश आहेत.