कोणताही पुरस्कार सोहळा म्हटलं की तो कलाकारांसाठी खास असतो. त्याचं कारण म्हणजे त्या पुरस्कार सोहळ्यात त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळते. अर्थात त्या आधी नामांकन मिळणंदेखील महत्त्वाचं असतं. कारण नामांकन मिळणंदेखील मोठी गोष्ट असते. येत्या २६-२७ तारखेला ‘झी मराठी अवॉर्ड २०२४’ पार पडणार आहे. यंदाचं झी मराठीचं पंचविसावं महोत्सवी वर्ष आहे. या निमित्तानं झी मराठीचं संपूर्ण कुटुंब उत्कृष्ट आजपर्यंतच्या कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि एकमेकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी एकत्र एका छताखाली आलं. (Nitish Chavan Emotional)
नुकताच यंदाचा ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२४’ हा भव्य पुरस्कार सोहळा पार पडला. मराठी टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील कलाकार ‘झी मराठी’च्या २५ वर्षाचा अद्भुत प्रवासाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी कलाकारांनी रेड कार्पेटवर पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाखांपासून आताच्या आधुनिक फॅशनपर्यंत हजेरी लावली होती. या सोहळ्यात अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या भव्य सोहळ्याचे काही खास क्षण सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात आले आहेत आणि यापैकी एका प्रोमोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
आणखी वाचा – Video : “आज आई-वडील असते तर…”, पुरस्कार स्वीकारताना ‘शिवा’ला अश्रू अनावर, तिला पाहून उपस्थितही रडले अन्…
झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर करण्यता आला आहे ज्यात पूर्वा कौशिक, राकेश बापट व नितीन चव्हाण हे भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये नितीश चव्हाणच्या भावाने झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यात खास हजेरी लावली. यावेळी आपल्या भावाला मंचावर पाहून नितीश खूपच भावुक झाला. यावेळी नितीशने असं म्हटलं की, “मी आज जे काही आहे माझ्या दादामुळे आहे. तो माझ्यासाठी करोडोतला एक दादा आहे”.
आणखी वाचा – बायकोसह नवऱ्याचाही गौरव, शिवानी रांगोळे व विराजसचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, “घरी ट्रॉफी घेऊन जाताना…”
झी मराठीने शेअर केलेला हा प्रोमो खूपच भावुक असून याकेली नितीश व त्याच्या भावाचा खास बॉण्ड पाहून उपस्थितांच्या डोळ्यातही पाणी आले. या प्रोमोला प्रेक्षकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. नितीश झी मराठी वाहिनीवरील ‘लागीर झालं जी’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आला. या मालिकेच्या पाच वर्षांनी त्याने ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतून पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक केलं आहे.