Jaya Bachchan Mother Passed Away : जया बच्चन यांच्या आई आणि अमिताभ बच्चन यांच्या सासू इंदिरा भादुरी यांचे भोपाळमध्ये निधन झाले असल्याचं वृत्त समोर आलं आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जया बच्चन यांच्या आईच्या निधनाच्या बातमीने बच्चन कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. जया बच्चन यांची आई काही दिवसांपासून आजारी होती, असे सांगितले जात आहे. मात्र, त्या सतत डॉक्टरांच्या देखरेखीखाली होत्या. रिपोर्ट्सनुसार, इंदिरा भादुरी भोपाळच्या श्यामला हिल्समधील अन्सल अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. तिथे त्या एकट्याच राहत होत्या, असंही बोललं जात आहे.
इंदिरा भादुरी यांचे पती तरुण भादुरी हे प्रसिद्ध पत्रकार व लेखक होते. अनेक प्रसिद्ध वृत्तपत्रांमध्येही त्यांनी काम केले. इंदिरा यांचे पती तरुण भादुरी यांचे १९९६ मध्ये निधन झाले होते, त्यानंतर इंदिरा भादुरी या त्यांच्या भोपाळच्या घरात एकट्याच राहत होत्या. मंगळवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या दु:खद बातमीने सध्या संपूर्ण घरावर शोककळा पसरली आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्याने तिसऱ्यांदा थाटला संसार, थाटामाटात केलं तिसरं लग्न, मामाच्या मुलीशीच जुळले सुर
एकीकडे दिवाळीनिमित्त घरोघरी जल्लोषाची तयारी सुरु असतानाच दुसरीकडे आता बच्चन कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले आहे. अमिताभ व कुटुंबातील इतर सदस्य चार्टर्ड विमानाने भोपाळला पोहोचत असल्याचंही वृत्तात म्हटलं जात आहे. अभिषेक व श्वेता बच्चन त्यांच्या आजीच्या खूप जवळ होते. जया बच्चन यांचे आई-वडील मध्य प्रदेशातच दीर्घाकाळापासून वास्तव्यास होते. जया बच्चन यांचाही जन्म मध्य प्रदेशातील भोपाळ येथे झाला.
आणखी वाचा – बायकोसह नवऱ्याचाही गौरव, शिवानी रांगोळे व विराजसचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, “घरी ट्रॉफी घेऊन जाताना…”
जया बच्चन यांना आणखी दोन बहिणी आहेत, ज्यांची नावे रीटा व नीता आहेत. रिटा यांनी अभिनेता राजीव वर्माशी लग्न केले. जया बच्चन यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्या लहान वयातच सिनेक्षेत्रात आल्या. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी सत्यजित रे यांच्या ‘महानगर’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं.