मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णीने मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकत स्वतःची ओळख निर्माण केली. आज तो एक लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आहे. त्याच्या कामाबरोबरच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. विराजसने अभिनेत्री शिवानी रांगोळेशी लग्नगाठ बांधली. शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी हे मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं. त्या दोघांचा चाहतावर्गही मोठा आहे. त्यांची केमिस्ट्री सर्वांनाच आवडते. विराजस आणि शिवानी यांनी दोन वर्षांपूर्वी नवरा-बायको म्हणून नव्या नात्याची सुरुवात केली. (Virajas Kulkarni and Shivani Rangole Award)
शिवानी व विराजस हे दोघे मनोरंजन क्षेत्रात आहेत. याआधी त्यांना वेगवेगळ्या भूमिकांसाठी पुरस्कार मिळाले आहेत. अशातच त्यांना नुकताच ‘आंतरराष्ट्रीय आयकॉनिक अवॉर्ड्स २०२४’ हा पुरस्कार मिळाला असून या पुरस्काराबद्दलची खास पोस्ट विराजसने शेअर केली आहे. विराजस व शिवानीने ‘आंतरराष्ट्रीय आयकॉनिक अवॉर्ड्स २०२४’ या पुरस्कार सोहळ्याची ट्रॉफी हातात घेतलेला फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोसह त्याने असं म्हटलं आहे की, “एकाच क्षेत्रात काम करत असलो की कधी कधी असल्या गमती ही होतात”.
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “आनंदाची गोष्ट म्हणजे आम्ही दोघेही आपापल्या कामासाठी घरी ट्रॉफी घेऊन जात आहोत”. यापुढे त्याने हॅशटॅग “अजून ट्रॉफीस हव्यात” असंही म्हटलं आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. तसंच अनेकांनी त्यांना या पुरस्कारानिमित्त त्याचे कौतुक केलं आहे. “अभिनंदन”, “माझी आवडती जोडी”, “आम्हाला तुमची जोडी खूप आवडते”, “असेच कायम पुढे जात राहा” अशा अनेक कमेंट्स करत या फोटोला चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – Video : “आज आई-वडील असते तर…”, पुरस्कार स्वीकारताना ‘शिवा’ला अश्रू अनावर, तिला पाहून उपस्थितही रडले अन्…
दरम्यान, विराजसबद्दल बोलायचं झालं तर, त्याने झी मराठी वरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेमुळे अल्पावधीतच विराजस घराघरात लोकप्रिय झाला. विराजस हा उत्तम अभिनेता तर आहेच शिवाय लेखक आणि दिग्दर्शकही आहे. प्रायोगिक नाट्यक्षेत्रात विराजस अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.
आणखी वाचा – विमानतळावर ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्री व कुशल बद्रिकेची भेट, तोंडभरुन कौतुक करत म्हणाली, “तुझा अभिमान…”
तसेच शिवानीदेखील मराठी सिनेसृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. स्टार प्रवाह वरील ‘सांग तू आहेस ना’ ही तिची मालिका गाजली होती. शिवानीने आपल्या अभिनयानं स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सध्या ती ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.