बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी हल्ला करण्यात आला. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सैफवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला ठाणे येथून अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी याबद्दल स्वतः खुलासा केला. प्रेस कॉन्फरन्समध्ये पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीबद्दल माहिती दिली. आरोपीचे नाव मोहम्मद शहजाद असून तो हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करत होता. मात्र तो एका अभिनेत्याच्या घरात घुसला आहे याची कल्पना नसल्याचे त्याने चौकशीदरम्यान सांगितले. केवळ चोरी करण्याच्या उद्देशाने घरात घुसल्याचेही त्याने सांगितले. मात्र त्यावेळी सैफ समोर आल्याने बचाव करण्यासाठी हल्ला केल्याचे तो म्हणाला. (saif ali khan attack update)
दरम्यान सैफवरील हल्ल्याला चार दिवस झाले आहेत. त्याला भेटण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार मंडळीदेखील पोहोचले. सैफची आई शर्मिला टागोर व बहीण सोहा अली खान या पुन्हा एकदा रुग्णालयात त्याला भेटण्यासाठी गेलेल्या दिसून आल्या. त्यानंतर सैफची मुलं तैमुर व जेहदेखील करीनाबरोबर रुग्णालयात आल्याचे दिसून आले. शर्मिला, सोहा व कुणाल खेमू लीलावती रुग्णालयाबाहेर स्पॉट झाले. सैफ लवकर बरा व्हावा यासाठी अनेक जण प्रार्थना करत आहेत. तसेच सैफचे कुटुंबीयदेखील चिंतेत असलेले दिसून येत आहेत.
आणखी वाचा – बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अडकला लग्नबंधनात, थाटामाटात पार पडला विवाहसोहळा, फोटो समोर
दरम्यान काही दिवसांपूर्वी सैफचे काही कागदपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये २१ जानेवारीला सैफला रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल असे नमूद केले होते. त्यामुळे आता सैफ अजून दोन दिवस रुग्णालयात राहील. हल्ल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या मानेवर व मणक्यावर गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या होत्या. त्याच्या एका जखमेतून चाकूचा लहान तुकडादेखील काढण्यात आला. जखम अजून खोल असती तर त्याला लकवा मारण्याची शक्यता होती असेही डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र आता सैफ सुखरूप आहे.
बॉलिवूडमधील अनेक कलाकर त्याची खुशाली जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. तसेच काही कलाकारांनी तो लवकर बरा व्हावा तसेच घडलेल्या प्रकाराचा निषेधदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला. लवकरच अभिनेता सुखरुपपणे घरी यावा यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत.