Dahavi-A daily updates : ‘इट्स मज्जा’च्या नवीन ‘दहावी-अ’ या वेब सीरिजचे आतापर्यंत एकूण चार भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. दर सोमवारी व गुरुवारी दुपारी १.३० वाजता ‘इट्स मज्जा’च्या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. पहिल्या भागात सुरुवातीला आभ्या, विक्या, किरण्या व मध्या हे चौघे इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना पाहायला मिळाले. इंग्रजी विषयावरुन या मित्रांमधली मजामस्ती या सीनमध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या भागात शाळेच्या संस्थेतील एक मुख्य व्यक्ती शाळेच्या पाहणीसाठी येतात आणि तेमुलांची तुकडीनुसार विभागणी करायला सांगतात. तिसऱ्या भागात या मुलांची विभागणी करण्यात आली आहे. (Dahavi-A daily updates)
‘दहावी-अ’मधून त्यांना ‘दहावी-ड’मध्ये जाण्यास सांगितले जाते. मात्र शाळेचा हा निर्णय मुलांना आवडला नसून याबद्दल ते मुख्याध्यापकांकडे जातात आणि त्यांना हा निर्णय मान्य नसल्याचे सांगतात. मात्र हा निर्णय तुम्हाला मान्य करावाच लागेल असं मुख्याध्यापक मुलांना ठणकावतात. त्यामुळे चिडलेली मुलं शाळेतील वस्तूंचं नुकसान करतात आणि पळ काढतात. यानंतर चौथ्या भागात मुलांना त्यांनी केलेल्या चुकीची समाज आली आहे. यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी ते कांबळे सरांची मदत घेतात. त्यावर कांबळे सर त्यांना मी कुठलीही मदत करणार नसून जे काही नुकसान झालं आहे ते भरून द्यावं लागेल असं सांगतात.
त्यामुळे सगळी मुलं शाळेच्या झालेल्या नुकसान भरपाईचा खर्च भरून काढण्यासाठी मेहनत घेण्याचे ठरवतात. यासाठी ते गावोगावी जाऊन कोणतंही काम करण्याचा निर्णय घेतात. यासाठी त्यांनी एका घरात कामही केलं आहे. मात्र यातून त्यांना कमी पैसे मिळाले आहेत. नुकसान भरपाईची एकूण रक्कम भरून काढण्यासाठी ते शाळेत न जाता पूर्ण दिवस काम करण्याचा निर्णय घेतात. मात्र याचवेळी त्यांना शाळेच्या दहावी-अ या महत्त्वाच्या वर्षाचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचीही जाणीव होते.
आणखी वाचा – Bigg Boss 18 चा ग्रँड फिनाले कधी होणार?, विजेत्याला मिळणार तब्बल इतकी रक्कम, कोण ट्रॉफी घरी घेऊन जाणार?
त्यामुळे आता आगामी भागात नेमकं काय बघायला मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आभ्या, विक्या, रेश्मा, केवडा, किरण्या, मध्या हे सर्व मिळून शाळेचे नुकसान भरू शकतील का? त्यांना मदत करणारी केवडा यात अडकणार तर नाही ना? आणि या सगळ्यातून कांबळे सर त्यांना काय धडा शिकवणार? हे येत्या भागात पाहायला मिळणार आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना आगामी भागातून मिळतील.