सध्या सर्वत्र लगीन घाई सुरु असलेली दिसून येत आहे. २०२४-२०२५ मध्ये अनेक कलाकारांच्या जोड्या लग्नबंधनात अडकल्या. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड गायक अरमान मलिक त्याची गर्लफ्रेंड आशना श्रॉफबरोबर लग्नबंधनात अडकला. त्यांच्या लग्नाचे अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. अशातच आता अजून एक गायकाने लग्नगाठ बांधली आहे. नवरात्रीच्या वेळी ‘चोगाडा थारा’ हे गाणं हमखास वाजतं. हे गाणं गायक दर्शन रावल याने गायलं आहे. हा गायक नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये तो त्याच्या बायकोबरोबर दिसून येत आहे. (darshan rawal wedding)
प्रसिद्ध गायक दर्शन त्याची गर्लफ्रेंड धरल सुरेलियाबरोबर लग्नबंधनात अडकला आहे. दर्शन व धरल यांनी एकत्रित पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये दोघांनी लग्नसंमारंभावेळचे काही फोटो शेअर करत लिहिले की, “माझी कायमस्वरूपीची सगळ्यात चांगली मैत्रीण”. शेअर केलेल्या फोटोमध्ये दर्शल व धरल खूप सुंदर दिसत आहेत. दर्शनने फिकट पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली असून सुंदर असा फेटा बांधला आहे. तसेच धरलने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तसेच त्यावर मॅचिंग असे दागिनेदेखील घातले आहेत. दोघंही एकमेकांबरोबर खूप खुश असलेले दिसत आहेत.
धरलच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ती एक आर्किटेक्ट, डिझाइनर व आर्टिस्ट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोघं रिलेशनशिपमध्ये होते. नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दर्शनने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल कधीही भाष्य केले नाही. तसेच त्याने आजवर धरलबरोबरचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले नाहीत. त्यामुळे आता अचानक त्याच्या लग्नाचे फोटो बघून त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोवर कलाकार व चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दर्शनच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तो बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध गायक आहे. त्याने ‘लव्हयात्री’, ‘कमरिया’, ‘लव्ह आजकल’, ‘शेरशाह’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी” या चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. तसेच त्याच्या गाण्यांचे अल्बमदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.