शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ॲनिमल’ चित्रपटात पात्र साकारताना रणबीर कपूरला आली वडिलांची आठवण, स्वतःचं खुलासा करत म्हणाला, “माझे बाबा खूप…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 24, 2023 | 1:41 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
ranbir kapoor tells animal avatar inspired by father

ranbir kapoor tells animal avatar inspired by father

बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाची बरीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटात रणबीरचा हटके अंदाजात पाहायला मिळणार आहे. गुरूवारी दिल्लीत या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शनाचा करण्यात आला. या कार्यक्रमाला अभिनेत्री रश्मिका मंदन्ना व रणबीर कपूरसह बॉबी देओल, दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा, निर्माता भूषण कुमार उपस्थित होते. यावेळी रणबीरला त्याच्या चित्रपटातील भूमिकेबाबत विचारण्यात आलं. तेव्हा त्याने या भूमिकेचा संदर्भ त्याच्या वडिलांशी जोडत त्याने या भूमिकेबाबत खुलासा केला.  (ranbir kapoor tells animal avatar inspired by father)

ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमात रणबीर कपूर फुल ब्लॅक कपड्यात पाहायला मिळाला. तर रश्मिकाने शिफॉन प्रिंटेड साडी नेसली होती. या कार्यक्रमात त्याला चित्रपटातील त्याच्या भूमिकेबाबत विचारण्यात आलं होतं. तेव्हा तो म्हणाला, “’ॲनिमल’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान मी दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनाही हाच प्रश्न विचारला होता. मला या भूमिकेसाठी एखादं उदाहरण द्या. तेव्हा मला अचानक माझ्या बाबांची आठवण आली. माझे बाबा हे खूप आक्रमक तसेच तापट स्वभावाचे होते. त्यामुळे ही भूमिका मी त्यांना डोळ्यासमोर ठेवून केली”.

View this post on Instagram

A post shared by Ranbir Kapoor (@ranbirkapooronline)

आणखी वाचा – Video : हृदयाचे ठोके वाढणं, डोळ्यासमोर अंधार अन्…, अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बहिणीची झाली वाईट अवस्था, म्हणाली, “मी एकटी…”

रणबीर कपूरचा ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट फ्लॉप झाला होता तेव्हा त्याचं पूर्ण खापर ऋषि कपूर यांनी अनुराग बसु याच्यावर फोडलं होतं. त्यावेळी त्यांनी अनुराग बसूला बेजबाबदार असंही म्हटलं होतं. इतकंच नाही तर ऋषी यांनी एका मुलखतीत म्हणाले होते, “अनुराग बसूने गज्जा जासूस, जग्गा जासूस बनवला. हा चित्रपट माझ्या उच्चारणा प्रमाणेच खूप खराब आहे. मला वाटतं ते या चित्रपटात खूप जास्तच बुडून गेले होते”.तेव्हाच रणबीरने एका मुलाखतीत सांगितलं होतं, “मी माझ्या वडिलांच्या डोळ्यात बघून कधीच बोलत नाही. नजर खाली करून मी त्याच्याबरोबर संवाद साधतो आणि फक्त हो म्हणतो. बऱ्याच वेळा त्यांना समजवणं खूप कठीण होतं. अशावेळी मी माझ्या आईला सांगून माझा मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. मी त्यांना नियंत्रित नाही करु शकता”, असं सांगत त्याने एका मुलाखतीत त्याच्या बाबांचा म्हणजेच ऋषी कपूर यांचा कसा दरारा होता हे त्याच्या वक्तव्यातून समजून येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ranbir Kapoor (@ranbirkapooronline)

आणखी वाचा – वाढदिवसानिमित्त अमृता खानविलकरला मिळाल्या नवऱ्याकडून खास शुभेच्छा; आभार मानत म्हणाली, “मागील २० वर्ष…”

रणबीर कपूर व रश्मिका मंदान्नासह या चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओलही दिसणार आहेत. अनिल कपूर या चित्रपटात रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता बॉबी देओल चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट एक गँगस्टर ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटाची कथा वडील व मुलाच्या नात्यावर आधारीत आहे. हा चित्रपट १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.  

Tags: animal moviebollywood actorinspired by fatherranbir kapoorrishi kapoor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : 'बिग बॉस १७'मध्ये राखी सावंत व आदिल खान दुर्रानी येणार? अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, "कोणालाही प्रसिद्धी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.